Mumbai Water Cut News: मुंबईकरांनो लक्ष द्या! 'या' भागातील पाणीकपात अखेर संपली; पाहा तुमच्या नळाला पाणी कधी येणार?

Published : Apr 07, 2026, 09:00 PM IST

Mumbai Water Cut News: बृहन्मुंबई महानगरपालिकेने घाटकोपर जलाशयाच्या दुरुस्तीचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले. यामुळे १० एप्रिल २०२६ पासून विस्कळीत झालेला पाणीपुरवठा पुन्हा जुन्या वेळेनुसार सुरळीत होणार आहे.

PREV
17
मुंबईकरांनो लक्ष द्या! 'या' भागातील पाणीकपात अखेर संपली

मुंबई: घाटकोपर पश्चिम परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. घाटकोपर जलाशयातील (Ghatkopar Reservoir) दोन मोठ्या कप्प्यांच्या दुरुस्तीचे किचकट काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) जल अभियंता विभागाने यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालेला पाणीपुरवठा आता १० एप्रिल २०२६ पासून पुन्हा जुन्या वेळेनुसार सुरळीत होणार आहे. 

27
तुमच्या भागातील पाणीपुरवठ्याची नवीन वेळ जाणून घ्या

दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेने विविध विभागांसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

37
१. नारायणनगर आणि चिरागनगर परिसर (NX 03)

प्रमुख भाग: आझाद नगर, गणेश मैदान, पारशीवाडी, विद्याविहार (पश्चिम), किरोळ गाव, एल.बी.एस. मार्ग परिसर.

सुधारित वेळ: दुपारी ०३:१५ ते सायंकाळी ०७:१५ वाजेपर्यंत. 

47
२. पंतनगर आऊटलेट आणि भीमनगर परिसर (NX 06)

प्रमुख भाग: लोअर भीमनगर, नित्यानंद नगर, सी.जी.एस. वसाहत, गंगावाडी, श्रेयस सिग्नलपर्यंतचा एल.बी.एस. मार्ग परिसर.

सुधारित वेळ: सायंकाळी ०६:४५ ते रात्री ११:०० वाजेपर्यंत. 

57
३. सर्वोदय बुस्टींग परिसर

प्रमुख भाग: सॅनिटोरियम गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, गांधीनगर परिसर.

सुधारित वेळ: सायंकाळी ०७:१५ ते रात्री ०९:१५ वाजेपर्यंत (ही वेळ पूर्वीप्रमाणेच कायम राहील). 

67
नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना

पाणीपुरवठा पूर्ववत होत असला तरी, तांत्रिक दुरुस्तीनंतर सुरुवातीच्या काळात पाण्याचा दर्जा बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने खालील आवाहन केले आहे.

पुढील ५ दिवस पाणी उकळून आणि गाळूनच प्यावे.

पाणीपुरवठा नियमित होत असला तरी पाण्याचा वापर काटकसरीने करावा. 

77
प्रशासकीय दिलासा

जलाशयाच्या कप्प्यांमध्ये देखभालीचे काम सुरू असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या भागात तात्पुरत्या आणि कमी वेळेसाठी पाणी दिले जात होते. मात्र, १० एप्रिलपासून सर्व तांत्रिक अडथळे दूर झाल्याने घाटकोपरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories