
Political Reaction on Thackeray Cousins Hint at Reunion : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची नुकतीन अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एक मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांना दोन्ही ठाकरे एकत्रित येणार का असा प्रश्न विचारला. यावर राज ठाकरेंनी उत्तर देत म्हटले की, आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रित येण्यास तयार आहे. यावरुनच आता चर्चांना उधाण आले असून राजकीय नेत्यांकडून या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, “राज ठाकरे म्हणतायत जर आमच्या दोन्ही भावडांमध्ये काही वाद असतील तर मी माझा अहंकार बाजूला ठेवेन आणि वाद मिटवून महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी उत्तम करू. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आम्ही दोघे भावंड असून आमच्यामध्ये वाद नाहीत आणि जरी असतील तरीही आम्ही ते मिटवू. पण तुम्ही महाराष्ट्रातील गद्दारांना तुमच्या घरात आणि शिवसेनेत (UBT) जागा देऊ नका...जर तुम्ही यावर सहमत असाल तर आपण नक्कीच बोलू.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की," जर दोन व्यक्ती वेगळ्या झाल्यानंतर एकत्रित येत असतील तर आम्ही आनंदी असू. कारण जर लोक त्यांच्यामधील वाद बाजूला ठेवत असतील तर हे चांगलेच आहे. यावर अजून काय बोलू शकतो."
शिवसेना खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया
शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. म्हस्के यांनी म्हटले आहे की, "राज ठाकरेंना कोणतीही जबाबदारी दिल्यास ते घराबाहेर पडतील अशी धमकी उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यांनी राज ठाकरेंच्या मुंबईतील शाखांना भेट देण्यास विरोध केला. त्यांनी राज ठाकरेंसाठी काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना वेगळे केले.त्यांनी राज ठाकरेंना विरोध का केला याचे उत्तर त्यांनी आधी द्यावे." अशी टीका म्हस्केंनी केली आहे."