नवीन मुंबई विमानतळाजवळ वैमानिकांची प्लॉट्स, आलिशान व्हिलाज खरेदी

Published : Apr 19, 2025, 07:59 PM ISTUpdated : Apr 19, 2025, 08:02 PM IST
Navi Mumbai International Airport

सार

Mumbai : लवकरच नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार आहे. अशातच विमानतळाजवळ काही प्लॉट्स आणि आलिशान व्हिलाज खरेदी करण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. 

Mumbai : येत्या दोन महिन्यांमध्ये नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होणार आहे. त्यानंतर येथून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु होतील. त्यामुळे एअरलाईन फ्रॅटरनीटीमध्ये या विमानतळाजवळ प्लॉट्स आणि आलिशान व्हिलाज खरेदी करण्यासाठी जणू झुंबड उडाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन एअरलाईन फ्रॅटरनीटीशी निगडित गुंतवणूकदार येथे पैसे गुंतवताना दिसून येत आहेत.

नवी मुंबई विमानळाजवळ प्रॉपर्टीच्या किमती आधीच गगनाला भिडल्या आहेत. त्यात आता एअरलाईन फ्रॅटरनीटीने खरेदीसाठी उत्सूकता दाखविल्याने प्रॉपर्टीच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता बळावली आहे. येथील प्लॉट्स आणि व्हिलाजच्या किमती कोट्यवधी रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.

येत्या काही महिन्यांमध्ये या विमानतळावरुन दैनंदिन व्यावसायिक उड्डाण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे त्यापूर्वी या परिसरात प्रॉपर्टीची खरेदी जोरात सुरु झाली आहे. काही नागरिक तर या परिसरात राहायलाही आले आहेत.

निवृत्त झालेल्या नागरिकांनीही या परिसरात प्रॉपर्टी खरेदीसाठी उत्सूकता दाखवली आहे. निवृत्तीचा पैसा ते प्रॉपर्टीमध्ये गुंतवताना दिसून येत आहे. त्यामुळेही येथे प्रॉपर्टी बुम आहे.

जुहू, विले पार्ले, सांताक्रूज परिसरात प्रॉपर्टीचे दर प्रचंड वाढले आहेत. सध्याच्या विमानतळाजवळ असल्याने या भागाला चांगली किंमत आली आहे. हिच परिस्थिती नवी मुंबई विमानतळावर दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे. दिवसागणिक येथील प्रॉपर्टीच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे नवीनवीन खरेदीदार या परिसरात रस दाखवत असल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे मुंबई आणि पश्चिम पुणे येथून हे विमानतळ जवळपास सारख्या अंतरावर असल्याने पुण्यातील ग्राहकांनीही या परिसरात प्रॉपर्टी खरेदीस उत्सूकता दर्शविली आहे.

PREV

Recommended Stories

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो लक्ष द्या! 8–9 डिसेंबरला 24 तास पाणी कपात; 14 विभागांवर मोठा परिणाम
Mumbai Local : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! सुरक्षेसाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन', लोकलमध्ये 'हा' जबरदस्त बदल होणार!