मुंबईतील विलेपार्ले येथील जैन मंदिरावर महापालिकेचा बुलडोझर, समाजाकडून जोरदार आक्रोश (VIDEO)

Published : Apr 19, 2025, 04:52 PM ISTUpdated : Apr 19, 2025, 04:59 PM IST
Mumbai Jain Temple Demolished Protest in Vile Parle

सार

Jain Temple Demolished in Mumbai : विलेपार्ले येथील 90 वर्ष जुन्या जैन मंदिरावर महालिकेद्वारे बुलडोझर चालवण्यात आला आहे. यामुळे जैन समाजाकडून संताप व्यक्त करत जोरदार आंदोलन केले जात आहे.

Jain Temple Demolished in Mumbai : मुंबईतील विलेपार्ले (Vile Parle) येथील 90 वर्ष जुने दिगंबर जैन मंदिर मुंबई महापालिकेकडून तोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यामुळे जैन समुदायाकडून आक्रोश केला जात असून आंदोलनही सुरू झाले आहे. 16 एप्रिलला खरंतर महापालिकेने जैन मंदिरावर बुलडोझर चालवण्यात आला होता. पण 19 मार्चला सकाळी 9.30 वाजल्यापासून मुक मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये हजारो जैन लोक सहभागी झाले होते.

या मोर्चामध्ये जैन मुनी, मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि भाजप आमदार पराग अलवणी सहभागी झाले होते. विलेपार्ले स्थानकापासून ते महापालिकेच्या के-पूर्व वॉर्डपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता.

भाजप सरकारमधील मंतिरी, आमदारही सहभागी

जैन समाजाचा आरोप आहे की, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका हॉटेल मालकासोबत मिलीभगत करुन अनधिकृतपणे मंदिर पाडले. याच्या विरोधातील मोर्चामध्ये भाजप सरकारमधील मंत्री आणि आमदार सहभागी झाले होते. आमदार मुरजी पटेल यांनी म्हटले की, "आम्ही या गोष्टीची निंदा करतो. लवकरात लवकर अधिकाऱ्यांच्या विरोधात कार्यवाही करावी, त्यांना पदावरुन हटवावे. आम्ही मुख्ममंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. आम्ही सत्ताधारी आमदार, आज रस्त्यावर उतरलो आहोत. आम्ही देखील दु:खी आहोत."

याशिवाय मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले की, “आम्ही या अधिकाऱ्यांच्या विरोधात कार्यवाही करू. पण हे आपलेच सरकार आहे, तरीही या परिस्थितीबद्दल विचारले असता त्यांनी मौन बाळगले.”

नक्की काय आहे प्रकरण?

विलेपार्ले परिसरात एक जैन सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये 30 वर्षांपूर्वी जैन मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. सोसायटीच्या बाहेरच राधा-कृष्ण नावाचे हॉटेल आहे. सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून असा आरोप करण्यात आला आहे की, काही वर्षांपूर्वी या हॉटेलच्या मालकाने त्यांच्या मंदिराच्या विरोधात महापालिकेकडे तक्रार केली होती. या तक्ररीमध्ये असे म्हटले होते की, सोसायटीमध्ये अनधिकृतपणे जैन मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे.

या तक्रारीनंतर महापालिकेने मंदिर पाडण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. पण जैन सोसायटीने मुंबई उच्च न्यायालयात महापालिकेच्या आदेशाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. कोर्टाने याचिकेनुसार, 15 एप्रिलपर्यंत मंदिर पाडण्याच्या कार्यवाहीवर बंदी घातली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मंदिर तोडण्याचे काम सुरू करण्यात आले.

सोसायटीमध्ये राहणाऱ्या जैन नागरिकांचे असे म्हणणे आहे की, ते 16 एप्रिलला उच्च न्यायालयात स्टे ऑर्डरचा कालावधी वाढवण्यासाठी याचिका दाखल करणार होते. पण त्याआधीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मिलीभगत करत कार्यवाही केली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील देण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला तोडण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे निलंबन करावे अशी मागणी जैन समाजाकडून केली जात आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट