Published : Jan 26, 2024, 11:46 AM ISTUpdated : Jan 26, 2024, 02:05 PM IST
Republic Day 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन केले आणि जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन करून तिरंग्यास मानवंदना दिली.
25
देशाच्या सुवर्णमहोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छाही दिल्या.
35
तसेच “भारत देश हा प्रगतीच्या वाटेवर नवी क्षितिजे पादाक्रांत करत असून यामध्ये सर्वाधिक वाटा हा महाराष्ट्राचा असेल”, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.
45
यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी, पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली.
55
WATCH VIDEO : मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!