Mumbai Trans Harbour Link : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूची केली पाहणी

Shivadi Nhava Sheva Sea Link : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (6 जानेवारी 2024) शिवडी-न्हावाशेवा सी लिंकची पाहणी केली. 

 

Harshada Shirsekar | Published : Jan 6, 2024 9:24 AM IST / Updated: Jan 06 2024, 07:20 PM IST

110

शिवडी-न्हावाशेवा सी लिंक (Shivadi Nhava Sheva Sea Link) म्हणजेच अटल सेतू प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी या 22 किलोमीटर लांबीच्या सागरी सेतूचे लोकार्पण केले जाणार आहे.

210

यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (6 जानेवारी 2024) या सागरी सेतू प्रकल्पाला भेट दिली.

310

मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळेस पुलाच्या कामाची पाहणी करून शिवडी ते चिर्ले हे संपूर्ण अंतर पार केले.

410

तसेच नियंत्रण कक्षाला (Control Room) भेट देऊन या पुलाचे नियंत्रण कशाप्रकारे होणार आहे, याचीही माहिती त्यांनी जाणून घेतली.

510

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी केलेल्या तयारीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काही सूचनाही दिल्या.

610

यावेळेस मुख्यमंत्र्यासोबत कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha), एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी (Dr. Sanjay Mukherjee), मुंबई मनपा आयुक्त इकबालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) तसेच मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.

710

या प्रकल्पामुळे पनवेलपासून दक्षिण मुंबईच्या (South Mumbai) दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांचे सुमारे 15 किलोमीटर इतके अंतर कमी होणार आहे. 

810

सोबतच गर्दीच्या वेळेस सुमारे दीड ते दोन तासाच्या प्रवासाच्या वेळेचीही बचत होईल.

910

या मार्गावर प्रवास करणाऱ्या कारसाठी 250 रूपयांचा टोल आकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

1010

वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी परतीचा पास एकेरी पथकराच्या दीडपट, दैनिक पास एकेरी पथकराच्या अडीचपट आणि मासिक पास एकेरी पथकराच्या पन्नासपट अशी सवलत देण्यात आलेली आहे.

आणखी वाचा : 

ऑन ड्युटी असलेल्या पोलिसाच्या कानशिलात लगावली, भाजप आमदार सुनील कांबळेंविरोधात गुन्हा दाखल

Watch Video: भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांना शिकवला धडा, सुरक्षितरित्या हायजॅक झालेल्या जहाजाची केली सुटका

राम मंदिर उभारणीमध्ये सर्वात मोठे आव्हान कोणते होते? या व्यक्तीने केला खुलासा

Share this Photo Gallery
Recommended Photos