Deep Clean Campaign : स्वच्छतेची मोहीम अखंडीतपणे सुरू ठेवा, मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

Published : Jan 06, 2024, 07:12 PM ISTUpdated : Jan 06, 2024, 07:19 PM IST

Deep Cleanliness Drive : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील कुलाबा परिसरात शनिवारी स्वच्छता मोहीम राबवली.

PREV
110

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईतील कुलाबा आणि पूर्व मुक्त मार्ग परिसरात शनिवारी (6 जानेवारी 2024) स्वच्छता मोहीम राबवली. “स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी संपूर्ण स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली असून राज्यात स्वच्छ महाराष्ट्रासाठी महास्वच्छता अभियानासही प्रारंभ झाल्याचे सांगत स्वच्छतेची मोहीम अखंडीतपणे सुरू ठेवा”, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी दिले आहेत.

210

मुंबईतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी 3 डिसेंबर 2023 पासून शहरात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. सलग पाच आठवड्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या मोहीमेत सहभागी होत आहेत.

310

शनिवारी (6 जानेवारी 2024) कुलाबा परिसरातून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

410

कुलाबा परिसरातील स्वच्छता मोहिमेची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

510

रस्त्यावर माती - कचरा दिसणार नाही, साचलेल्या कचऱ्याचे विलगीकरण करण्याविषयी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सूचनाही दिल्या.

610

यावेळेस त्यांनी परिसरात असणाऱ्या शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षकांनाही स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

710

“डीप क्लिनिंग मोहीम केवळ मुंबईपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यभरात राबवण्यात आली आहे. मोहीम नियमित सुरू असल्याने वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे”, असेही यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले.

810

पूर्व मुक्त मार्ग परिसरातील वाहतूक पोलीस चौकी येथेही संपूर्ण स्वच्छा मोहीम राबवण्यात आली.

910

तसेच स्वच्छता करणाऱ्या खऱ्या हीरोंकडे शासनाचे लक्ष राहील. त्यांच्या समस्या, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Recommended Stories