Mumbai : मुंबईतील एका रुग्णालयात मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात महिलेची प्रसूती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खरंतर, रुग्णालयातील बत्ती गुल झाल्याने प्रसूती करण्यासाठी मोबाइल टॉर्च वापरला गेला.
Mumbai : मुंबईतील एका रुग्णालयात महिलेची मोबाइलच्या टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये महिलेसह बाळाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात असा आरोप लावला जातोय की, प्रसूतीदरम्यान बत्ती गुल झाल्याने खूप वेळ झाला तरीही रुग्णालयाने जनरेटर सुरू केले नाही. प्रकरण अधिक चिघळले असता महापालिकेने रुग्णालयाच्या विरोधात तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.
11 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न
महिलेच्या नातेवाईकांनी असा आरोप केलाय की, 29 एप्रिलला रुग्णालयातील प्रसूती खोलीतील वीज गेली होती. जवळजवळ तीन तासांपर्यंत जनरेटरही सुरू केले नाही. अशातच डॉक्टरांनी मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात महिलेची प्रसूती केली. यामध्ये आई आणि बाळाचा मृत्यू झाला.
पती खुसरूद्दीन अंसारीने म्हटले की, पत्नी सहीदुनला प्रसूतीसाठी सुषमा स्वराज प्रसूती गृहात भरती करण्यात आले. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मला पत्नीसह बाळाला गमवावे लागले आहे. अंसारीने सांगितले की, 11 महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. या प्रकरणातील कुटुंबाने रुग्णालयाच्या विरोधात आंदोलन केल्याने महापालिकेने अधिक तपास सुरू केला आहे.
कुटुंबाने लावले गंभीर आरोप
नातेवाईकांनी असा आरोप लावला की, पीडित महिला पूर्णपणे हेल्दी होती. तिच्या पोटात नऊ महिन्यांचे बाळ होते. एवढेच नव्हे तिचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते. कुटुंबातील सदस्यांनी 29 एप्रिलला सकाळी 7 वाजता महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात नेले. प्रसूती सुरू केल्यानंतर डॉक्टरांनी महिलेला पूर्ण दिवस प्रसूती गृहातच ठेवले. रात्री 8 वाजता सांगण्यात आले की, सर्वकाही ठीक आहे. डॉक्टरांनी असेही म्हटले प्रसूती नॉर्मल होईल.
पण ज्यावेळी कुटुंबातील सदस्य प्रसूती गृहात गेले असता महिलेला रक्ताच्या थारोळ्यात होती. तिची प्रसूती सुरू केली होती आणि कुटुंबातील सदस्याची स्वाक्षरी घेण्यासाठीही डॉक्टर आले होते. त्याचवेळी वीज गेली तरीही रुग्णालयाने दुसऱ्या ठिकाणी हलवण्यास सांगितले नाही. मोबाइल टॉर्चच्या मदतीने महिलेची प्रसूती केली. आधी डॉक्टरांनी आई व्यवस्थितीत असून बाळाचा मृत्यू झालाय असे सांगितले. पण खरंतर, दोघांचाही मृत्यू झाला होता.
आणखी वाचा :
MBBS चे शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय मुलाची आत्महत्या, धक्कादायक कारण आले समोर