Municipal Corporation Election 2026 : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात, वाचा संपूर्ण माहिती

Published : Dec 23, 2025, 08:18 AM IST
Municipal Corporation Election 2026

सार

Municipal Corporation Election 2026 : महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे.  

Municipal Corporation Election 2026 : महाराष्ट्रात आगामी महापालिका निवडणुकांमुळे (Maharashtra Municipal Corporation Election 2026) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असून, पुढील काही दिवसांत राजकीय हालचालींना वेग येणार आहे. मात्र, निवडणुकांना अवघे काही दिवस उरले असतानाही महायुत्या आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत घोषणांचा अभाव असल्याने राजकीय चित्र अजूनही धूसरच आहे.

आजपासून उमेदवारी अर्ज; निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यातील 29 महापालिकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून ही प्रक्रिया 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारांना 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली आहे. 3 जानेवारीला अंतिम उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. सर्व महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर केले जातील.

 युती-अघाड्यांचा तिढा कायम; जागावाटपावरून पेच

निवडणुकांना अवघे 23 दिवस उरले असले तरी महायुत्या (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. अनेक ठिकाणी जागावाटपाचा तिढा कायम आहे. मुंबईसह राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांमध्ये मात्र भाजप आणि शिंदे सेनेत युतीवरून अजूनही खणाखणी सुरू असल्याचे चित्र आहे.

ठाकरे बंधूंच्या युतीकडे लक्ष; घोषणा कधी?

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे (Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance) यांच्यातील जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. शिवडीतील तीन प्रभागांपैकी दोन जागा ठाकरे गटाला आणि एक जागा मनसेला देण्यावर सहमती झाल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. मात्र, भांडूपमधील वॉर्ड क्रमांक 114 वरून अद्यापही रस्सीखेच सुरू आहे. ज्या ठिकाणी दोन्ही पक्ष आग्रही आहेत, तेथील निर्णय थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे घेत असल्याचे समजते.

महापालिका निवडणूक कार्यक्रम (Municipal Corporation Election 2026)

  • नामनिर्देशन : 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
  • छाननी : 31 डिसेंबर
  • अर्ज मागे घेणे : 2 जानेवारी 2026 पर्यंत
  • अंतिम यादी व चिन्ह वाटप : 3 जानेवारी 2026
  • मतदान : 15 जानेवारी 2026
  • मतमोजणी/निकाल : 16 जानेवारी 2026

PREV
Read more Articles on

Recommended Stories

या आठवड्यात 4 दिवस बँका बंद.. काळजी नको, बॅंकिंगसाठी हे 4 स्मार्ट उपाय करा
मुंबईत धक्कादायक प्रकार; वर्दीतील पोलिसाकडून गतीमंद महिलेसोबत अश्लील चाळे, नागरिकांनी दिला चोप