BMC Election 2026 : ठाकरे बंधूंचे ‘मराठी–मुस्लिम’ समीकरणावर लक्ष, 113 वॉर्ड्स ठरणार निर्णायक

Published : Dec 20, 2025, 08:22 AM IST
BMC Election 2026

सार

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू मराठी–मुस्लिम मतदारांच्या समीकरणावर भर देताना दिसत आहेत. 227 पैकी 113 वॉर्ड्स निर्णायक ठरणार असून, काही महत्त्वाच्या भागांवरून अजूनही जागावाटपाचा तिढा कायम आहे. 

BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूउद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपली राजकीय रणनीती ठरवण्यास सुरुवात केली असून, यामध्ये मराठी–मुस्लिम मतदारांचा फॅक्टर केंद्रस्थानी ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मराठी आणि मुस्लिम मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी शिवसेना (उबाठा) आणि मनसेकडून जागावाटप व प्रचाराची खास आखणी केली जात आहे.

227 पैकी 113 वॉर्ड्सवर विशेष लक्ष

मुंबई महापालिकेतील एकूण 227 वॉर्ड्सपैकी 41 वॉर्ड्समध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे, तर जवळपास 72 वॉर्ड्समध्ये मराठी मतदारांचे वर्चस्व आहे. या दोन्ही गटांचा प्रभाव असलेले एकूण 113 वॉर्ड्स ठाकरे बंधूंसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. त्यामुळे या वॉर्ड्समध्ये मराठी–मुस्लिम मतदारांचे संतुलन साधण्यावर विशेष भर दिला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

जागावाटपात मराठी–मुस्लिम फॅक्टरला प्राधान्य

शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांच्यात जागावाटपाबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये मराठी–मुस्लिम मतदारसंख्या असलेल्या वॉर्ड्सना सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये माहिम, गोवंडी, मानखुर्द, वांद्रे पूर्व आणि भायखळा या भागांत शिवसेनेला मुस्लिम मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचा अनुभव लक्षात घेऊन पुढील रणनीती ठरवली जात आहे.

काही भागांवरून अजूनही तिढा कायम

दुसरीकडे, मनसेकडून मराठी मतदार जिथे प्रभावी आहेत, त्या भागांमध्ये आपला गड मजबूत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र माहिम, दादर, विक्रोळी, भांडुप, लालबाग आणि वरळी या प्रभागांवरून दोन्ही पक्षांमध्ये अजूनही तिढा कायम आहे. या जागांवर अंतिम तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात थेट चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल, असे कळते.

मुंबईत 1 कोटी 3 लाख मतदार

मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शहरात एकूण 1 कोटी 3 लाख मतदार आहेत. यापैकी 53 टक्के पुरुष आणि 47 टक्के महिला मतदार आहेत.सर्वाधिक मतदार चांदिवली परिसरातील प्रभाग क्रमांक 164 मध्ये असून, सर्वात कमी मतदार सायन कोळीवाडा येथील प्रभाग क्रमांक 176 मध्ये आहेत. तर सर्वाधिक महिला मतदार बोरिवलीतील प्रभाग क्रमांक 15 मध्ये नोंदवले गेले आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Local : मुंबईकरांचा प्रवास आता 'कूल' होणार! मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एसी लोकलचा धडाका; पाहा किती फेऱ्या वाढल्या?
Mumbai MHADA Home : म्हाडाची लॉटरी की खिशाला कात्री? घरांचे नवे दर पाहून सामान्यांच्या पायाखालची जमीन सरकेल!