काय सांगता! मुंबईकराने तब्बल 42 लाख रुपयांचे खाद्यपदार्थ ऑर्डर केले, Swiggyचा धक्कादायक खुलासा

Online Food Order : भूक लागली की आपण एखादा पदार्थ तयार करण्याऐवजी फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर करतो. पण तुम्हाला माहितेय का, यंदाच्या वर्षात मुंबईतील एका व्यक्तीने चक्क 42 लाख रुपयांचे फूड हे स्विगीवरून (Swiggy) ऑर्डर केले आहे.

Mumbai Resident Ordered On Swiggy : यंदाचे वर्ष संपण्यास अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. या वर्षात मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाइन फुड ऑर्डर (Online Food Order) केले आहे. फुड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मपैकी एक असणाऱ्या स्विगीचा (Swiggy) फुड डिलिव्हरीसाठी सर्वाधिक वापर केला गेला. याच दरम्यान मुंबईतील एका व्यक्तीने स्विगीवरून चक्क 42 लाख 30 हजार रुपयांचे खाद्यपदार्थ ऑर्डर केल्याची माहिती समोर आली आहे.

स्विगीही गुगलच्या सर्च ट्रेण्डमध्ये
यंदाचे वर्ष संपण्याआधी गुगल ते युट्यूबवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेले ट्रेण्डिंग व्हिडीओ समोर येत आहेत. स्विगीचाही यामध्ये समावेश आहे. स्विगीने भारतातील स्विगीची स्थिती कशी असेल याबद्दल एक ब्लॉग जारी केला होता. स्विगीच्या ब्लॉगनुसार, एका मुंबईकराने स्विगीवरून 42 लाख 30 हजार रुपयांचे खाद्यपदार्थ ऑर्डर केल्याचे सांगण्यात आले आहे.

स्विगीवरून हे फूड केले ऑर्डर
स्विगीवरून दररोज मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ ऑर्डर केले जाते. उत्तर प्रदेशातील झांसी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने एकाच दिवसात 269 खाद्यपदार्थ ऑर्डर केले. अशाप्रकारे ओडिशा राज्यातील भुवनेश्वर शहरामधील एका घरात 207 पिझ्झा ऑर्डर करण्यात आले. तर दुर्गापूजेवेळी देशातभरात 77 लाख गुलाबजामची ऑर्डर करण्यात आली.

भारताचे बिर्याणी प्रेम
भारतात यंदाच्या वर्षात प्रति सेकंद 2.5 बिर्याणीची ऑर्डर केली गेली. हैदराबादमधील एका स्थानिकाने संपूर्ण वर्षभरात 1 हजार 633 बिर्याणी ऑर्डर केली. म्हणजेच एकाच दिवसात चारपेक्षा अधिक बिर्याणीची ऑर्डर दिली. दरम्यान, सर्वाधिक मोठी बिर्याणीची ऑर्डर ही चंदीगड शहरातून मिळाली होती.  

आणखी वाचा: 

धक्कादायक! बदलापुरात ट्रेनच्या डब्याचा दरवाजा केला बंद, ऐन गर्दीच्या वेळेस प्लॅटफॉर्मवर उडाला मोठा गोंधळ

Parking Rules : मुंबईत अवैधरित्या गाडी पार्क करणाऱ्यांवर होणार कारवाई, महापालिकेचा मोठा निर्णय

Mumbai : 9 डिसेंबरपासून दादर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म्संना मिळणार नवे क्रमांक, गोंधळ होण्यापूर्वी वाचा सविस्तर माहिती

 

 

 

Share this article