Mumbai Rains : मुंबईत आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता, वाचा घराबाहेर पडण्यापूर्वी लोकल गाड्यांची स्थिती

Published : Aug 21, 2025, 09:00 AM IST

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचले असून वाहतूक आणि हवाई आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याची स्थिती निर्माण झाली.अशातच हवामान खात्याकडून मुंबईसाठी गुरुवारी (21 ऑगस्ट) यलो अलर्ट देण्यात आला आहे.  

PREV
15
ढगाळ वातावरण राहिल

भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी शहर आणि उपनगरात हलका पाऊस आणि ढगाळ आकाश राहण्याची शक्यता वर्तवली आहे. सलग सहा दिवसांपासून मुसळधार पावसानंतर शहराला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

25
हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता

गुरुवारी, कोकणातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

35
मुंबईसह ठाणे, सोलापूरसाठी यलो अलर्ट

महाराष्ट्रात, मुंबई, पुणे, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, जालना आणि नागपूरसह आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर बुलढाणा, अकोला आणि गोंदियासह काही भागांसाठी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

45
लोकल गाड्या रद्द

पश्चिम रेल्वेच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर आजच्या कोणत्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत याची माहिती दिली आहे.  यानुसार, २१ ऑगस्ट रोजी बाधित झालेल्या गाड्यांमध्ये ६१००२ दिवा-बोईसर मेमू, ६१००१ बोईसर-वसई रोड मेमू आणि ६१००३ वसई रोड-दिवा मेमू यांचा समावेश आहे.

55
20 ऑगस्टची स्थिती

बुधवारी, मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात सलग सहाव्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरूच राहिला. सततच्या पावसामुळे नांदेड, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे आणि सांगली या नऊ जिल्ह्यांतील ४,६०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

Read more Photos on

Recommended Stories