Property Card Online News: मुंबईतील मालमत्ताधारकांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली असून, प्रॉपर्टी कार्डमधील फेरफार आणि संबंधित ४५ कामं आता पूर्णपणे ऑनलाईन झाली. नागरिक 'महाभूमी' पोर्टलद्वारे घरबसल्या अर्ज करू शकतात, मोबाईलवर अपडेट्स मिळवू शकतात.
मुंबईकरांना 'गुड न्यूज'! प्रॉपर्टी कार्ड आणि फेरफारची ४५ कामं आता एका क्लिकवर
Property Card Online News: मुंबईत घर किंवा जमीन असणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठी भेट दिली आहे. आता प्रॉपर्टी कार्डमधील फेरफार (Mutation) आणि त्याशी संबंधित तब्बल ४५ प्रकारची कामे पूर्णपणे ऑनलाईन होणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली असून, यामुळे मुंबईतील सुमारे ३० लाख मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
25
घरबसल्या व्हाया 'महाभूमी' पोर्टल!
मुंबईतील जमिनींच्या नोंदींची पद्धत उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळी असल्याने ऑनलाईन प्रक्रियेत काही तांत्रिक अडथळे येत होते. मात्र, आता खास सॉफ्टवेअर विकसित करून हे अडथळे दूर करण्यात आले आहेत.
अधिकृत संकेतस्थळ: नागरिक आता mahabhumi.gov.in या पोर्टलवर जाऊन घरबसल्या फेरफारासाठी अर्ज करू शकतात.
लाईव्ह अपडेट्स: तुमच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आता कार्यालयात जाण्याची गरज नाही. अर्जाच्या प्रगतीबाबतचे सर्व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मेसेजद्वारे मिळतील.
35
'या' ४५ महत्त्वाच्या कामांचा समावेश
मुंबईत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये खालील प्रमुख कामांचा समावेश आहे.
सध्या मुंबईतील १९ महसूल विभाग आणि ४ नगररचना योजनांमधील एकूण २७,८४७ संगणकीय मिळकतपत्रिका (Property Cards) ऑनलाईन उपलब्ध झाल्या आहेत. या डिजिटल प्रणालीमुळे कामात कमालीची गती येईल आणि मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने भ्रष्टाचाराला पूर्णपणे आळा बसेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
55
सरकारचे आवाहन
नागरिकांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी न करता जास्तीत जास्त ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा, जेणेकरून वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल.
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.