Mumbai Local: मध्य रेल्वेने कल्याण ते कसारा मार्गावरील १० रेल्वे क्रॉसिंग बंद करून त्या जागी २३६ कोटी रुपये खर्चून पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लोकल गाड्यांना थांबावे लागणार नाही.
Mumbai Local: कल्याण ते कर्जत या मध्य रेल्वे मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या लोकल प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे! रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी आणि लोकलच्या वक्तशीरपणात सुधारणा करण्यासाठी एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
25
१० क्रॉसिंग बंद, २३६ कोटींची पूल क्रांती
मध्य रेल्वेने कल्याण ते कसारादरम्यान येणारी १० रेल्वे क्रॉसिंग कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या १० ठिकाणी आता नवीन रेल्वे पूल (ROB) बांधले जाणार आहेत.
या संपूर्ण 'मेगाप्लॅन'साठी रेल्वे प्रशासन तब्बल २३६ कोटी रुपयांचा निधी खर्च करणार आहे.
35
वेळ वाचेल आणि लोकल थांबणार नाही
सध्याच्या लेव्हल क्रॉसिंगमुळे लोकलच्या वेळेवर मोठा परिणाम होतो. एका क्रॉसिंग गेटसाठी सरासरी ३ ते ७ मिनिटे लागतात. एकदा फाटक उघडले की अनेक गाड्या थांबवाव्या लागतात. याचा थेट फटका लोकलच्या वक्तशीरपणाला बसतो. दिवा स्थानक हा उपनगरीय मार्गावरील अत्यंत वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणी दिवसातून किमान ३९ वेळा फाटक उघडले जाते. येथून रोज धावणाऱ्या ८९४ लोकलपैकी ७० ते ७५% लोकल थांबतात, ज्यामुळे वेळेवर परिणाम होतो. हे १० क्रॉसिंग बंद झाल्यावर लोकलला कुठेही थांबावे लागणार नाही. यामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार असून, मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणात मोठी सुधारणा अपेक्षित आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १० लेव्हल क्रॉसिंग गेट बंद करून आरओबी (Road Over Bridge) बांधण्यासाठी निविदा (Tenders) आधीच मागवण्यात आल्या आहेत. या कामांची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल.
55
हा निर्णय खोपोली आणि कर्जतहून येणाऱ्या लोकलसाठी खूप फायदेशीर
हे गेट्स कॉरिडॉरच्या शेवटच्या टोकावर असले तरी, त्यांचा परिणाम सीएसएमटीकडे येणाऱ्या सर्व गाड्यांवर होत होता. हा निर्णय खोपोली आणि कर्जतहून येणाऱ्या लोकलसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.