MHADA ची मुंबईकरांसाठी 'भन्नाट' योजना! लॉटरीचं टेन्शन नाही, 'पहिले या-पहिले मिळवा' तत्त्वावर म्हाडाचं घर तुमचं

Published : Nov 08, 2025, 03:43 PM IST

MHADA Lottery 2025: म्हाडाने घर खरेदीसाठी लॉटरी पद्धत रद्द करून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही नवी योजना आणली. या योजनेत उत्पन्न गट, आयकर रिटर्नची अट शिथिल करण्यात आली असून, ताडदेव, पवई, अँटॉप हिलमधील सुमारे १०० घरे थेट विक्रीसाठी उपलब्ध होणारय. 

PREV
15
MHADA ची मुंबईकरांसाठी 'भन्नाट' योजना!

MHADA Big News: मुंबईतील घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडा (MHADA) मुंबई मंडळाने एक अत्यंत उत्तम आणि आकर्षक निर्णय घेतला आहे. आता घरांसाठी सोडत (लॉटरी) काढली जाणार नाही! 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (First Come, First Served) या सोप्या तत्त्वावर म्हाडाची घरे थेट खरेदी करता येणार आहेत. मुंबईकरांसाठी ही खऱ्या अर्थाने गुड न्यूज आहे. 

25
लॉटरी नाही, थेट खरेदी! नियम शिथिल, घरासाठीचे मार्ग मोकळे

म्हाडाच्या मुंबई मंडळाने ज्या घरांसाठी दोन किंवा अधिक वेळा सोडत काढली गेली, पण तरीही ती विकली गेली नाहीत, अशा घरांसाठी हा मोठा बदल केला आहे. लवकरच, सुमारे १०० घरांच्या विक्रीसाठी पुढील १० दिवसांत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि त्यानंतर थेट विक्री प्रक्रिया सुरू होईल. 

35
या योजनेतील सर्वात मोठी विशेष गोष्ट म्हणजे

सोडत (लॉटरी) नाही: अर्ज करा, अनामत रक्कम भरा आणि घर तुमचे! जो नागरिक सर्वात आधी अर्ज करेल, त्यालाच घराचे वाटप केले जाईल.

उत्पन्न गटाची अट नाही: म्हाडाने या प्रक्रियेत अनेक कठोर अटी शिथिल केल्या आहेत. कोणत्याही उत्पन्न गटातील नागरिक (अल्प, मध्यम, उच्च) या घरांसाठी अर्ज करू शकतात.

आयकर रिटर्न/दाखला बंधनकारक नाही: घर घेण्यासाठी आयकर विवरणपत्र (ITR) किंवा कोणताही करदात्याचा दाखला सादर करण्याची गरज नाही.

ज्यांच्याकडे घर आहे, त्यांनाही संधी: आता ज्यांच्या नावावर आधीपासून घर आहे, त्यांनाही म्हाडाचे घर घेता येणार आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांना संधी मिळणार आहे. 

45
ताडदेव, पवईसह अँटॉप हिलमधील घरे उपलब्ध

या योजनेत महागड्या घरांचाही समावेश आहे, ज्यांना पूर्वी कमी प्रतिसाद मिळाला होता.

ताडदेव (Tardeo): 'क्रिसेंट टॉवर' प्रकल्पातील सुमारे ७ कोटी किमतीची सात आलिशान घरे अजूनही उपलब्ध आहेत.

पवई (Powai): तुंगा परिसरातील मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील सुमारे १ ते १.५ कोटी किमतीची घरे देखील विक्रीसाठी आहेत.

अल्प उत्पन्न गट (LIG): अँटॉप हिलमधील अल्प उत्पन्न गटातील (LIG) घरांचाही या योजनेत समावेश आहे. 

55
घर खरेदीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

म्हाडाने अटी शिथिल केल्याने कागदपत्रेही अत्यंत कमी आणि सोपी ठेवण्यात आली आहेत. घर खरेदीसाठी केवळ खालील कागदपत्रे पुरेशी असतील.

आधारकार्ड (Aadhaar Card)

पॅनकार्ड (PAN Card)

निवासाचा पुरावा (Proof of Residence)

म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, या 'प्रथम प्राधान्य' विक्री योजनेमुळे मुंबईतील रिक्त घरे लवकर विकली जातील आणि मुंबईकरांचे स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न सहज पूर्ण होईल. 

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories