Mumbai Local: लोकलच्या गर्दीला पूर्णविराम? मध्य रेल्वेचा 'गेमचेंजर' प्लॅन जोरात, प्रवाशांना मोठा दिलासा!

Published : Nov 26, 2025, 05:14 PM IST

Mumbai Local : मुंबईकरांना मोठा दिलासा देत मध्य रेल्वेने लोकल प्रवासातील गर्दी कमी करण्यासाठी मोठी पाऊले उचलली आहेत. 15 डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या 22 वरून थेट 240 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

PREV
16
प्रवाशांना मोठा दिलासा!

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी आणि लाखो लोकांची जीवनगाडी मुंबई लोकल. पण या लोकलमधील प्रचंड गर्दी ही समस्या वर्षानुवर्षे मुंबईकरांच्या नशिबीच राहिली आहे. गर्दीचे प्रमाण इतके वाढले की प्रवास करणंही जिकीरीचं बनलं. आता अखेर मध्य रेल्वेने मुंबईकरांसाठी मोठी पाऊले उचलली आहेत. लोकलमधील कोंडी कमी करण्यासाठी रेल्वेने 15 डब्यांच्या लोकलची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा निर्णय घेतला असून काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

26
12 नाही… आता 15 डब्यांच्या अधिक लोकल!

सध्या मध्य रेल्वे मार्गावर फक्त 22 फेऱ्या 15 डब्यांच्या लोकलद्वारे चालवल्या जातात. मुंबईसारख्या महानगरासाठी हा आकडा अत्यंत अपुरा असल्याने रेल्वे प्रशासनाने तो थेट 240 फेऱ्यांपर्यंत वाढवण्याची तयारी सुरू केली आहे.

यामुळे

गाड्यांतील गर्दी कमी होईल

प्रवाशांना अधिक जागा मिळेल

प्रवासातील ताणतणाव मोठ्या प्रमाणात घटेल 

36
का महत्त्वाचा आहे हा बदल?

15 डब्यांची लोकल 12 डब्यांपेक्षा तब्बल 25% अधिक प्रवासी वाहून नेऊ शकते. म्हणजेच एका फेरीत शेकडो जागा वाढणार. सीएसएमटी–कर्जत आणि सीएसएमटी–कसारा या गर्दीच्या मार्गांवर या गाड्यांची गरज सर्वाधिक असल्याने तिथे फेऱ्या वाढवण्यावर भर आहे. 

46
पायाभूत सुविधा अपग्रेड, काम वेगाने सुरू

यापूर्वी 15 डब्यांच्या लोकल वाढवताना अनेक अडथळे आले होते.

फलाटाची अपुरी लांबी

सिग्नल प्रणालीतील मर्यादा

स्टॅबलिंग आणि पिटलाइनची कमतरता

आता मध्य रेल्वेने या सर्व अडचणींवर काम सुरु केले आहे.

34 स्थानकांवर फलाट विस्ताराचे काम प्रगतीपथावर

यापैकी 27 स्थानके डिसेंबरअखेर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.

काम सुरू असलेली प्रमुख स्थानके

शहाड, आंबिवली, टिटवाळा, वाशिंद, आसनगाव, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शेलू, भिवपुरी, कर्जत, खोपोली, पळसदरी, मुंब्रा, कोपर, कळवा आणि इतर काही स्थानके. 15 डब्यांच्या लोकलसाठी किमान 350 मीटर लांबीचे फलाट आवश्यक असल्याने कामाचा वेग मोठा मुद्दा ठरत आहे. 

56
नव्या रेकसाठी अतिरिक्त जागाही तयार

सध्या 15 डब्यांचे दोनच रेक CSMT आणि कल्याण येथे उभे राहतात.

वाढत्या मागणीचा विचार करून

CSMT व कल्याण येथे अतिरिक्त जागा तयार केली जात आहे

वांगणी आणि भिवपुरी येथे 15 डब्यांचे रेक उभे करण्यासाठी नवीन सोयी उभारल्या जात आहेत 

66
प्रकल्पाची अंमलबजावणी दोन टप्प्यांमध्ये

पहिला टप्पा: विद्यमान 12 डब्यांच्या लोकलचे 15 डब्यांत रूपांतर

दुसरा टप्पा: आणखी 10 रेक 15 डब्यांत बदलून सेवेत दाखल

दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर

एकूण 20 लोकल रेक

240 फेऱ्या दररोज

मोठ्या प्रमाणात वाढलेली क्षमता

या सर्वांमुळे मुंबईकरांचा दैनंदिन लोकल प्रवास अधिक आरामदायक, मोकळा आणि सोयीस्कर होण्याची पूर्ण शक्यता आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories