
मुंबई : 24 कॅरेट सोन्याचे दर संपूर्ण देशभरात जवळजवळ लाखो रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. अशातच सोनं खरेदी करताना लोक दहावेळा विचार करत आहेत. याशिवाय आगामी सण-उत्सव, लग्नसोहळ्यांसाठी ज्वेलरी खरेदी करताना लाखोंच्या घरात पोहोचलेल्या सोन्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम झालाच आहे. पण सोन्याची ज्वेलरी खरेदी करताना देखील वारंवार विचार केला जात आहे. अशातच सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञांनी पुढील पाच महिने जरा जपूनच गुंतवणूक करावी असा सल्ला दिला आहे..
मुंबईतील आजचे सोन्याचे दर
मुंबईत 24 कॅरेट सोन्यामधील 1 ग्रॅमसाठी 9981 रुपये तर 10 ग्रॅम 97,020 आणि 1 तोळ्यासाठी 1,16,424 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईत जुलै महिन्यात सर्वाधिक 22 ग्रॅम सोन्याचे दर 9,460 रुपये तर 24 कॅरेटसाठी 9,933 रुपये होते. याशिवाय सर्वाधिक कमी तर मुंबईतच जुलैमध्ये 22 कॅरेट सोन्याचे 9,100 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचे 9,555 रुपये प्रति ग्रॅम होते. एकूणच सोन्याचे दरात काही वेळासाठी घसरण झाली असली तरीही त्यानंतर सातत्याने दर वाढल्याचा ट्रेन्ड आहे.
तज्ज्ञांचा सोन्याच्या गुंतवणूकीसाठी सल्ला
तज्ज्ञ असे म्हणातयात की, आता जागतिक स्तरावर आर्थिक स्थिती सुधारत आहे. अमेरिकेत व्याजदार कपात होण्याची शक्यता, डॉलर इंडेक्स खाली घसरणे आणि भू-राजकीय तणाव कमी झाल्याने आता सोन्याच्या दरात वेगाने वाढ होईल असे वाटत नाही. राहुल कलंत्री (मेहता इक्विटीज) म्हणतात, सोन्याच्या दरातील तेजी काही काळासाठी संथ होऊ शकते. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतणूक करणे टाळावे. कमी वेळात उत्तम परतावा हवा असल्यास चांदीचा पर्याय निवडू शकता.
चांदीत गुंतवणूक करा
चांदीसाठी औद्योगिक मागणी आणि आर्थिक विस्तारामुळे उत्तम परतावा देऊ शकतो. यामध्ये देखील गुंतवणूक करताना विचार करावा असे तज्ज्ञ म्हणत आहेत.
सोन्यात कुठे करू शकता गुंतवणूक?
-गोल्ड ईटीएफ
-गोल्ड म्युचअल फंड
-फिजिकल गोल्ड
-सोविरियन बाँन्ड्स