Mumbai Kandivali Fire : मुंबईत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, 8 वर्षीय चिमुकल्यासह महिलेचा होरपळून मृत्यू

Mumbai Fire : कांदिवली पश्चिम परिसरातील आठ मजली इमारतीत लागलेल्या आगीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 

Mumbai Fire News : मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरातील आठ मजली इमारतीत भीषण अग्नितांडव घडले. महावीर नगर (Mahaveer Nagar) परिसरातील पावन धाम वीणा संतूर इमारतीला (Pavan Dham Veena Santur Building) लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि पाच जण जखमी झाले आहेत.

जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. सोमवारी (23 ऑक्टोबर 2023) दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे काम केले. 

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या एकूण आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या आणि त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे कार्य पोलीस यंत्रणा करत आहे.

कधी घडली दुर्घटना?

दुपारी 12 वाजून 27 मिनिटांनी इमारतीत आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. या दुर्घटनेत एक महिला व आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत पावलेल्या महिलेचे नाव ग्लोरी वालफटी (वय 43 वर्ष) आणि मुलाचे नाव जोसू जेम्स रॉबर्ट (वय 8 वर्ष) असल्याचे म्हटले जात आहे. 

गोरेगावमध्ये अग्नितांडव! 7 जणांचा होरपळून मृत्यू, जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता

6 ऑक्टोबर 2023लाही गोरेगाव येथील सात मजली इमारतीत भीषण अग्नितांडव घडले होते. पहाटेच्या सुमारास 'जय भवानी' नावाच्या इमारतीला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर 51 जण जखमी झाले होते.

कसे घडले होते अग्नितांडव?

जय भवानी इमारतीतील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार इमारतीच्या पार्किंग परिसरातून स्फोटाचे आवाज ऐकू आले होते. त्यानंतर स्फोट होऊन मोठी आग भडकली. येथील कपडे तसंच अन्य गोष्टींमुळे आग झपाट्यानं वाढत गेली. यात पार्किंगमधील कार व चारचाकी गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आणखी वाचा

Four Year Old Girl Died : 4 वर्षांच्या चिमुकलीचा खिडकीतून पडून मृत्यू, लेकीला घरात एकटे ठेवण्याचा निर्णय पालकांना पडला महाग

Mumbai School Boy Death : पीटी क्लासमध्ये 13 वर्षीय विद्यार्थ्याचा कोसळून मृत्यू, पोलीस करताहेत तपास

Share this article