Mumbai School Boy Death : पीटी क्लासमध्ये 13 वर्षीय विद्यार्थ्याचा कोसळून मृत्यू, पोलीस करताहेत तपास

Published : Oct 12, 2023, 12:10 PM ISTUpdated : Dec 26, 2023, 11:30 AM IST
Mumbai_Kandivali_School_Boy_Death

सार

मुंबईतील कांदिवली पश्चिम भागातील एका शाळेत शारीरिक शिक्षणाचा (PT In School) वर्ग सुरू असताना 13 वर्षीय विद्यार्थ्याचा कोसळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 

Mumbai School Boy Death : मुंबईतील एका शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाचा (Physical Training In School) तास सुरू असताना 13 वर्षीय विद्यार्थ्याचा कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. Mid-Day या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील पश्चिम उपनगरात मोडणाऱ्या कांदिवली पश्चिम परिसरातील ही घटना आहे. मृत पावलेलया विद्यार्थ्याचे नाव ओम सचिन गंडेचा (Om Sachin Gandecha) असे आहे. 

ओम हा मूळचा गुजरातमधील रहिवासी होता. कांदिवलीतील श्री. आर.जे. माखेजा हायस्कूलच्या (Shri RJ Makheja High School) हलाई बालश्रम वसतिगृहामध्ये ( Halai Balashram hostel of Shree RJ Makheja High School in Kandivli) तो राहत होता. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची (Police have registered an Accidental Death Report) नोंद केली आहे आणि पुढील तपास देखील सुरू केलाय.

10 दिवसांपूर्वी झाली होती डेंग्यूची लागण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 दिवसांपूर्वी ओमला डेंग्यूची लागण झाली होती. पण या आजारातून त्याची प्रकृती ठीक देखील झाली होती. यानंतर त्यानं सोमवारपासून (9 ऑक्टोबर 2023) शाळेत जाण्यास सुरुवात केली. 

पण शारीरिक शिक्षणाचा वर्ग (physical training session at a school) सुरू असताना तो अचानक कोसळला व या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटलं जात आहे. पण ओमचा मृत्यू होण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. 

9 ऑक्टोबरला शाळेत नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पी.टी.चे शिक्षक संतोष शर्मा शाळेच्या मैदानात शारीरिक प्रशिक्षणाचा वर्ग घेत होते. यावेळेस सर्व विद्यार्थी झाडाखाली बसले होते. यादरम्यान ओम अचानक जमिनीवर पडला. शिक्षकांनी तोंडावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. 

पण ओमकडून काहीही प्रतिसाद मिळत नव्हता. यानंतर तातडीने त्याला कांदिवलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला (Om Gandecha declared dead) मृत घोषित केले.

आणखी वाचा :

Goregaon Fire : गोरेगावमध्ये अग्नितांडव! 7 जणांचा होरपळून मृत्यू, जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता

बॉलिवूडचा किंग SHAHRUKH KHANच्या जीवाला धोका, धमक्यांनंतर मिळालं Y PLUS सुरक्षाकवच

Pathankot Terrorist Attack : पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी ठार, गोळ्या झाडून केली हत्या

PREV

Recommended Stories

Thane Metro : ठाणेकरांनो, तुमची प्रतीक्षा संपली! मेट्रो-4 डिसेंबरमध्ये सुरू होणार
मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!