Lalbaugcha Raja Mandal : लालबागचा राजा मंडळाला मुंबई महापालिकेने ठोठावला 72 हजार रुपयांचा दंड, कारण…

Published : Oct 13, 2023, 12:39 PM ISTUpdated : Oct 13, 2023, 12:43 PM IST
Lalbaugcha Raja Ganeshotsav Mandal

सार

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर मुंबई महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कारवाईनुसार तब्बल 72 हजार रुपये दंड मंडळाकडून वसूल करण्यात आले आहेत. 

BMC Fined Lalbaugcha Raja Ganeshotsav Mandal : मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला (BMC fines Lalbaugcha Raja 72000 for potholes) मुंबई महानगरपालिकेकडून 72 हजार रुपयांचा (Bmc Fines Lalbaugcha Raja Mandal) दंड ठोठावण्यात आला आहे. 

गणेशोत्सव काळादरम्यान (Lalbaugcha Raja 2023) मंडप बांधणी आणि अन्य कामांसाठी मंडळानं मंडपात व मंडप परिसरात खड्डे खोदल्याने  ‘लालबागचा राजा’ मंडळाला महापालिकेने दंड ठोठावला. 

मंडळाने खोदले होते 36 खड्डे

मंडप परिसरामध्ये एकूण 36 खड्डे निदर्शनास आल्याने पालिकेच्या ‘एफ’ दक्षिण विभागाने 72 हजार रुपये (Lalbaugcha Raja Mandal Fined ₹72,000 for Road Potholes) दंडाची नोटीस मंडळाला बजावली आहे. प्रती खड्डा दोन हजार रुपये याप्रमाणे महापालिकेनं 72 हजार रुपयांचा दंड आकारला आहे.  

‘दंडाची रक्कम भरली’

दुसरीकडे पालिकेकडून दंडाची नोटीस मिळताच दंडाची रक्कम भरल्याची माहिती लालबागचा राजा मंडळाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान गेल्या वर्षीही लालबागचा राजा मंडळाने तब्बल 182 खड्डे खोदले होते. त्यावेळेस मुंबई महापालिकेकडून तीन लाख 66 हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला होता.

महापालिका प्रशासनाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करत एखाद्या मंडळाकडून मंडप परिसरात खड्डे खोदल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. यानुसारच ‘लालबागचा राजा’ गणेश मंडळावरही (Mumbai Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal) कारवाई करण्यात आली आहे.

 

आणखी वाचा

Four Year Old Girl Died : 4 वर्षांच्या चिमुकलीचा खिडकीतून पडून मृत्यू, लेकीला घरात एकटे ठेवण्याचा निर्णय पालकांना पडला महाग

Mumbai School Boy Death : पीटी क्लासमध्ये 13 वर्षीय विद्यार्थ्याचा कोसळून मृत्यू, पोलीस करताहेत तपास

बॉलिवूडचा किंग SHAHRUKH KHANच्या जीवाला धोका, धमक्यांनंतर मिळालं Y PLUS सुरक्षाकवच

PREV

Recommended Stories

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो लक्ष द्या! 8–9 डिसेंबरला 24 तास पाणी कपात; 14 विभागांवर मोठा परिणाम
Mumbai Local : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! सुरक्षेसाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन', लोकलमध्ये 'हा' जबरदस्त बदल होणार!