मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतवासाला कार्यालय उडवून देण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीच्या विरोधात FIR दाखल

Published : Feb 11, 2024, 10:54 AM ISTUpdated : Feb 11, 2024, 10:55 AM IST
Mumbai police

सार

मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथील अमेरिकेच्या वाणिज्य दूतवासाला धमकीचा इमेल आला आहे. धमकीचा इमेल आल्याने मुंबईतील बीकेसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

Threat email to US consulate general : मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल (Bandra-Kurla Complex) येथील अमेरिकेच्या वाणिज्य दूतवासाला एक धमकीचा इमेल आला आहे. मुंबई पोलिसांनी या संदर्भात अधिक माहिती देत म्हटले की, धमकीचा इमेल आल्यानंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा इमेल 9 फेब्रुवारीला आला होता. यानंतर अमेरिकेच्या वाणिज्य दूतवासाने याची माहिती मुंबई पोलिसांना दिली होती.

इमेलमध्ये काय लिहिले होते?
रिपोर्ट्सनुसार, एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अमेरिकेच्या वाणिज्य दूतवासाला धमकीचा इमेल पाठवल्याने एफआयआर दाखल केला आहे. एफआयआर आयपीसी कलम 505 (1)(B) आणि 506(2) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. धमकीचा इमेल इंग्रजी भाषेत लिहिल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

अमेरिकेच्या वाणिज्य दूतवासाजवळील सुरक्षाव्यवस्थेत वाढ
या प्रकरणात गुन्हे शाखेच्या मदतीने अधिक तपास केला जात असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. याशिवाय इमेलचा आयपी अ‍ॅड्रेस (IP Address) ट्रेस करण्याचाही प्रयत्न केला जातोय. याशिवाय ज्या व्यक्तीने धमकीचा इमेल पाठवलाय त्याचाही शोध घेतला जात असून आता अमेरिकेच्या वाणिज्य दूतवासाच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

आणखी वाचा : 

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याच्या घटनेवर जितेंद्र आव्हाड ते संजय राऊत यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

कांदिवलीत चार वर्षीय चिमुकलीवर शिपायाकडून लैंगिक अत्याचार, शाळेविरोधात पालकांचे जोरदार आंदोलन सुरू

Mumbai Costal Road : मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे 19 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट