
Mumbai CSMT Station High Alert : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहेच. पण दुसऱ्या बाजूला सुरक्षा यंत्रणा अॅलर्ट मोडवर आहेत. अशातच मुंबईतील स्थानकांवर हायअॅलर्ट आहे. खासकरुन गर्दीचे ठिकाण असणाऱ्या सीएसएमटी स्थानकाच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे.
सीएसएमटी रेल्वे स्थानकात आज (28 एप्रिल) रेल्वे पोलिसांकडून रूट मार्च असणार आहे. या ठिकाणी वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांसह आरपीएफ यांच्याकडून पाहणी केली जाणार आहे. याशिवाय डॉग स्क्वॉडही सीएसएमटी स्थानकात असणार आहे. खरंतर, नागरिकांच्या सुरक्षिततेतासाठी हे काम पार पाडले जात आहे. यावेळी स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासून पाहिले जाणार आहेत.
याआधी देखील गुरुवारी (24 एप्रिल) मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या किनारी भागातील सुरक्षा यंत्रणांना हाय अॅलर्टवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. याशिवाय महाराष्ट्र गृह विभागाने मुंबई पोलिसांना समुद्रात सतर्कता वाढवण्याचे निर्देशन दिले होते. दरम्यान, पहलगाममधील बैसरन घाटीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांना मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू झालेले पर्यटक महाराष्ट्रातील होते.