मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, घटनास्थळीच चार जणांचा मृत्यू

Published : Apr 28, 2025, 08:09 AM ISTUpdated : Apr 28, 2025, 10:00 AM IST
bolero accident

सार

Mumba Kolkata National Highway Accident : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.

Mumba Kolkata National Highway Accident : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा शहराजवळ असणाऱ्या बेला येथे झाला. सदर घटना 27 एप्रिलला रात्री 10.30 मिनिटांनी घडली. या अपघाताची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, रायपूर येथून आलेल्या बोलेरो वाहन नागपूरच्या दिशेने जात होते. यामध्ये पाच जण होते. बेला गावाजलळ असणाऱ्या साई प्रसादमध्ये जेवणासाठी गाडी वळवली असता समोरुन आलेल्या ट्रकवर आदळले आणि अपघात झाला. यामध्ये चारजण जागीच मृत्यूमुखी पडले. सध्या जखमी असणाऱ्या रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

PREV

Recommended Stories

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो लक्ष द्या! 8–9 डिसेंबरला 24 तास पाणी कपात; 14 विभागांवर मोठा परिणाम
Mumbai Local : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! सुरक्षेसाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन', लोकलमध्ये 'हा' जबरदस्त बदल होणार!