Mumbai : 19 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीच्या 14व्या मजल्यावरून खाली उडी मारत आत्महत्या

Mumbai Crime : मुंबईत राहणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे

Chanda Mandavkar | Published : Jan 4, 2024 4:50 AM IST / Updated: Jan 04 2024, 10:42 AM IST

Mumbai College Student Suicide : मुंबईत राहणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थिनीने राहत असलेल्या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (3 जानेवारी, 2024) घडली. याबद्दलची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Hindustan Timesने दिलेल्या वृत्तानुसार, विधी कुमार सिंग असे विद्यार्थिनीचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे. विधी गेल्या काही वर्षांपासून इमारतीत पेइंग गेस्ट (Paying Guest) म्हणून राहत होती.

डीएन नगर पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी म्हटले की, "मुंबईतील अंधेरी येथील मिलियनेयर हेरिटेज (Millionaire Heritage) इमारतीत विद्यार्थिनी राहत होती. विद्यार्थिनीच्या आत्महत्येची माहिती कळताच घटनास्थळी तातडीने पोलिसांनी धाव घेतली. घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी देण्यात आला आहे."

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास केला जात असल्याचेही पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याशिवाय विद्यार्थिनीने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइड नोट देखील लिहिली होती असे देखील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पोलिसांकडून आकस्मित मृत्यूची नोंद
पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले की, "इमारतीच्या पाहेरेकऱ्याने मुलीचा मृतदेह इमारतीखाली पडल्याचे पाहिले आणि त्यानंतर सोसायटीमधील अन्य सदस्यांना याबद्दल सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आत्महत्येबद्दल आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. याशिवाय मुलीच्या परिवारातील मंडळींना याबद्दल सांगण्यात आले आहे. मुलीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही."

आणखी वाचा: 

Thane: नववर्षाआधी ठाणे पोलिसांची मोठी कारवाई, रेव्ह पार्टीतून 95 जणांना घेतले ताब्यात

मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा यांच्या विरोधात FIR दाखल, पत्नीला बेदम मारहाण केल्याचा आरोप

Maharashtra Crime : चारित्र्याच्या संशयावरुन पतीकडून पत्नीसह चार जणांची हत्या, यवतमाळमधील धक्कादायक घटनेने खळबळ

Share this article