MHADA Mumbai Lottery: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आता फक्त दोन कागदपत्रांत घर मिळणार, जाहिरात कधी जाहीर होणार?

Published : Nov 17, 2025, 04:35 PM IST

MHADA Mumbai Lottery: म्हाडा मुंबई मंडळ लवकरच 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्वावर सुमारे 125 घरे विकणार आहे. विशेष म्हणजे, आता अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी झाली असून, सामान्य अर्जदारांना फक्त आधार आणि पॅन कार्डवर अर्ज करता येणार आहे. 

PREV
16
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी!

MHADA Mumbai Lottery: मुंबईत स्वतःचं घर मिळण्याची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. म्हाडा लवकरच नवीन लॉटरीची जाहिरात जाहीर करणार असून यावेळी अर्ज प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सोपी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे फक्त दोन कागदपत्रांवर तुम्ही म्हाडाच्या घरासाठी अर्ज करू शकणार आहात! 

26
मुंबईकरांची घराची स्वप्ने आता पूर्णतेकडे

मुंबई मंडळ लवकरच जवळपास 125 रिक्त घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या पद्धतीने थेट विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. ताडदेव, वडाळा, तुंगा पवई आणि इतर भागातील अनेक घरे वारंवार लॉटरीमध्ये विक्री न झाल्याने रिकामी होती. या घरांच्या देखभालीवरील खर्च वाढू लागल्यामुळे ही घरे लॉटरीऐवजी सोप्या प्रक्रियेत विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही घरे मुख्यतः मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी असणार आहेत. सध्या घरांच्या नवीन किंमती निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून किंमती ठरल्यावर जाहिरात प्रकाशित केली जाणार आहे.

36
म्हाडाचे घर मिळवण्यासाठी फक्त दोन कागदपत्रे!

या योजनेतील सर्वात मोठा बदल म्हणजे पूर्वी आवश्यक असलेली अनेक कठोर अटी आता रद्द करण्यात आल्या आहेत.

यापूर्वी अर्ज करताना

उत्पन्नाचा दाखला

आयकर विवरणपत्र

निवासी दाखला

विविध प्रमाणपत्रे

अशी एक मोठी यादी सादर करावी लागत होती. 

46
पण आता…

उत्पन्न मर्यादा रद्द

अर्जदाराच्या नावावर आधी घर असले तरी चालेल

फक्त आधार आणि PAN कार्डवर अर्ज करता येणार!

यामुळे घर मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोप्या, पारदर्शक आणि सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. 

56
आरक्षण गटासाठी मात्र आवश्यक दस्तऐवज कायम

सामाजिक आरक्षणांतर्गत अर्ज करणाऱ्यांना

जात प्रमाणपत्र

जातवैधता

ही कागदपत्रे पूर्ववत सादर करावीच लागतील.

म्हाडा अधिकाऱ्यांच्या मते, पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध होताच अर्जदार थेट ऑनलाइन नोंदणी करून या घरांसाठी अर्ज करू शकतील. 

66
हजारो नागरिकांसाठी मोठा दिलासा

या नव्या निर्णयामुळे अनेकांना मुंबईत परवडणारे, सुरक्षित आणि कायदेशीर घर मिळवणे आता अधिक सोपे होणार आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories