MHADA Lottery 2025: मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न आता होणार साकार!, म्हाडा आणणार लाखो परवडणारी घरं

Published : Oct 23, 2025, 03:21 PM IST

MHADA Lottery 2025: म्हाडा पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रभरात ७ लाख घरे बांधणार असून, त्यापैकी ५.५ लाख घरे मुंबईत असतील. ही परवडणारी घरे लॉटरी प्रणालीद्वारे विकली जातील, ज्याने मुंबईतील घरांची कमतरता कमी होऊन सामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल.

PREV
15
मुंबईकरांसाठी सुवर्णसंधी!

मुंबई: घर खरेदीचं स्वप्न पूर्ण होणं म्हणजे अनेकांसाठी आयुष्यभराचं उद्दिष्ट. आता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा (MHADA) घेऊन येत आहे सुवर्णसंधी! पुढील पाच वर्षांत म्हाडा महाराष्ट्रभर तब्बल ७ लाख घरांची निर्मिती करणार आहे, त्यापैकी जवळपास ५.५ लाख घरं मुंबईतच बांधली जाणार आहेत.

या प्रकल्पांमुळे शहरातील सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरं खरेदीची संधी मिळणार आहे. तसेच मुंबईतील घरांची कमतरता, वाढत्या लोकसंख्येमुळे वाढलेला दबाव आणि घरांच्या किंमतींचा चढा आलेला भार कमी होण्यास मदत होणार आहे.

25
मुंबईत कुठे उभारली जातील नवीन घरं?

म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ संजीव जयस्वाल यांनी सांगितले की, या घरांची विक्री लॉटरी प्रणालीद्वारे करण्यात येईल. सध्या म्हाडाचे काही महत्त्वाचे पुनर्विकास प्रकल्प वेगाने सुरू आहेत.

सायन – जीटीबी कॉलनी

अंधेरी – एसव्हीपी नगर

गोरेगाव – मोतीलाल नगर

कामाठीपुरा – मुंबई सेंट्रल परिसर

या भागांतील प्रकल्पांमुळे पुढील ५ ते ७ वर्षांत जवळपास २ लाख नवीन घरं तयार होतील. 

35
परवडणारी घरं, सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा

मुंबईत घर खरेदी करणं सामान्य नागरिकांसाठी आज अवघड बनलं आहे. वाढता शहरीकरणाचा वेग, मर्यादित जागा आणि रिअल इस्टेटच्या झपाट्याने वाढणाऱ्या किमतींमुळे घरं परवडत नाहीत. या समस्येवर उपाय म्हणून म्हाडाने क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प सुरू केले आहेत, ज्यातून हजारो कुटुंबांना नवीन आणि सुरक्षित घरं मिळणार आहेत. 

45
राज्यभरात म्हाडाची मोठी गृहनिर्माण मोहीम

मुंबईसह राज्यातील इतर भागांतही म्हाडा घरविक्री मोहिमेवर भर देत आहे. नुकतीच ठाणे येथील काशीनाथ घाणेकर सभागृहात कोकण विभागातील ५,३५४ घरं आणि ७७ भूखंडांसाठी लॉटरी सोडत घेण्यात आली.

गेल्या तीन वर्षांत म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाने १३,५०० हून अधिक घरं विकली आहेत. राज्यभरात या कालावधीत झालेल्या १८ लॉटरी सोडतींमधून ४३,००० घरं लोकांच्या मालकीची झाली आहेत. 

55
स्वप्न साकार होण्याची वेळ आली जवळ

म्हाडाच्या या मोठ्या गृहनिर्माण उपक्रमांमुळे मुंबई आणि परिसरातील घरांच्या टंचाईवर नियंत्रण येईल आणि सर्वसामान्य मुंबईकरांना स्वतःचं घर मिळण्याचं स्वप्न अखेर साकार होईल. आता तुमचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न फक्त स्वप्न राहणार नाही ते वास्तवात उतरवण्याची संधी अगदी दारात आली आहे!

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories