राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, या महिन्याचा पगार 26 ऑगस्टलाच, कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफीही

Published : Aug 22, 2025, 12:02 AM ISTUpdated : Aug 22, 2025, 12:03 AM IST

मुंबई - राज्यातील सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारक यांना ऑगस्ट महिन्याचा पगार ५ दिवस आधीच म्हणजे २६ ऑगस्ट रोजी बँक खात्यात जमा होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सवाचा आनंद दुप्पट झाला आहे.

PREV
15
पगार २६ ऑगस्ट रोजी

सरकारने काढलेल्या निर्णयानुसार, १ सप्टेंबर रोजी मिळणारा पगार २६ ऑगस्ट रोजी दिला जाणार आहे. हा निर्णय जिल्हा परिषद, अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे, संलग्न अशासकीय महाविद्यालये तसेच निवृत्तिवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तिवेतनधारकांनाही लागू राहणार आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना पगार लवकर मिळून खर्चासाठी हात मोकळे होतील.

25
बाप्पांच्या आगमनाची तयारी

गणेशोत्सवात घरोघरी बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू असते. मंडप सजावट, गोडधोड पदार्थ आणि इतर खर्च वाढतो. हे लक्षात घेऊनच सरकारने पगार आधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

35
गणेशोत्सवात रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या शेवटच्या ५ दिवसांत गणेश मंडळांना रात्री १२ वाजेपर्यंत देखावे दाखवण्याची परवानगी मिळणार आहे. याबाबतचा अधिकृत आदेश लवकरच मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत.

45
कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफी

यंदा गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा दिलासा दिला आहे. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात मुंबई-बंगळुरू महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर भाविकांच्या गाड्या आणि एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे.

55
कोकण दर्शन पास

यासाठी “गणेशोत्सव २०२५ – कोकण दर्शन” नावाचे विशेष पास दिले जातील, ज्यावर वाहन क्रमांक आणि मालकाची माहिती नोंदवली जाईल.

Read more Photos on

Recommended Stories