महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी, मास्क आणि सॅनिटायझर वापरायची आली वेळ

Published : May 25, 2025, 11:03 AM IST
Corona death

सार

ठाण्यात एका २३ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर काही वेळातच त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणांपुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

ठाणे | प्रतिनिधी राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे. आरोग्य यंत्रणांचे अलर्ट सुरू असतानाच ठाण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू कोरोनामुळे झाला असून विशेष बाब म्हणजे त्याचा कोरोना रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आल्याच्या काही वेळेतच त्याने अखेरचा श्वास घेतला.

या घटनेमुळे केवळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला नाही, तर आरोग्य यंत्रणांपुढेही अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. नागरिकांनी कोरोनाविषयी घेतलेली हलकीशी बेपर्वाई आता जीवघेणी ठरत असल्याचे या प्रकरणातून दिसून येत आहे.

प्राथमिक माहितीप्रमाणे, संबंधित तरुणाला काही दिवसांपासून सर्दी-खोकला व थकवा जाणवत होता. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्याचा कोविड टेस्टसाठी नमुना घेतला गेला. मात्र रिपोर्ट मिळण्याआधीच त्याची तब्येत झपाट्याने खालावत गेली. ज्या वेळी रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आला, त्याच सुमारास त्याने प्राण सोडले होते.

आरोग्य विभागाने सांगितले की, राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे. परंतु तरुण वयात अशी मृत्यूची घटना गंभीर इशारा देणारी ठरत आहे. संबंधित तरुणाला कोणतेही गंभीर आजार नव्हते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. त्यामुळे कोविड व्हायरसचे नवीन व्हेरिएंट अधिक घातक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

BMC Elections : महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची मोठी रणनीती ठरली! फडणवीस–शिंदे बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Central Railway : पनवेल–कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्ससाठी ४ दिवस रात्रकालीन ब्लॉक; अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल