Sunday Mega Block 25th May : येत्या रविवारी मध्य व हार्बर रेल्वेवर ब्लॉक, प्रवासापूर्वी पाहा हे वेळापत्रक

Published : May 24, 2025, 09:30 AM IST
Mumbai local train

सार

Sunday Mega Block : रविवारी लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. याशिवाय पश्चिम मार्गावर शनिवारी मध्यरात्री ब्लॉक असणार आहे. यामुळे वेळापत्रक पाहून नागरिकांनी घराबाहेर पडावे.

Sunday Mega Block 25th May 2025 :  मुंबईतील प्रवाशांसाठी रविवारी (उद्या) रेल्वेसेवेबाबत महत्त्वाचे अपडेट आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यान देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे या मार्गांवरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार असून काही लोकल फेऱ्या रद्द होतील, तर काही विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वेवर, माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत धिम्या मार्गावरील लोकल गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार असून काही फेऱ्या रद्द आणि काही सुमारे २० मिनिटे उशिराने धावतील.

ट्रान्स-हार्बर मार्गावर, ठाणे ते वाशी/नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत रेल्वे सेवा बंद राहणार आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलदरम्यान हार्बर मार्गावरील सेवा नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे.

पश्चिम रेल्वेवर, शनिवार रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ४.४५ या वेळेत भाईंदर ते बोरिवलीदरम्यान जलद मार्गावर स्वतंत्र ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे बोरिवली ते विरार/वसई रोडदरम्यान जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार असून, रात्री उशिराच्या काही लोकल फेऱ्या रद्द होणार किंवा उशिराने धावणार आहेत. मात्र, रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसेल.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

रत्नागिरीची वेदा ठरतेय इंटरनेट सेन्सेशन, वय 1 वर्ष 9 महिने, 100 मीटर पोहून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डममध्ये विक्रमाची नोंद!
BMC Elections 2025 : महायुतीचा महापालिका निवडणूक फॉर्म्युला ठरला; मुंबई–ठाण्यात BJP–शिंदे सेना एकत्र