मुंबई : राज्यातील नोकरदार महिलांच्या जीवनाला नवी उभारी देणारी आणि त्यांच्या लहान मुलांसाठी सुरक्षित व पोषणयुक्त वातावरण देणारी “पाळणा योजना” महाराष्ट्रात सुरू होत आहे. नोकरदार मातांच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी शासन उचलणार आहे.
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यभरात ३४५ पाळणा केंद्रे सुरू होतील. यासाठी निधी केंद्र व राज्य शासन अनुक्रमे ६०:४० या प्रमाणात उपलब्ध करून देणार आहे. केंद्र शासनाने २९ फेब्रुवारी २०२४ रोजी मान्यता दिली असून, राज्य शासनाच्या १३ ऑक्टोबर २०२४ च्या निर्णयानुसार ही योजना लागू होणार आहे.
25
योजनेची वैशिष्ट्ये
६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित देखभाल व डे-केअर सुविधा
३ वर्षाखालील मुलांसाठी पूर्व उद्दीपन, तर ३-६ वर्षे वयोगटासाठी पूर्वशालेय शिक्षण
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “या योजनेमुळे मातांना रोजगारात सहजता मिळेल आणि मुलांना सुरक्षित, शिक्षणाभिमुख व पोषणयुक्त वातावरण मिळेल. हा उपक्रम प्रत्येक आईसाठी दिलासा आणि प्रत्येक बालकासाठी भविष्याची हमी ठरेल.”