मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील आज (२९ ऑगस्ट) सकाळी मुंबईत दाखल झाले. आझाद मैदानात ते आजपासून उपोषणाला सुरुवात करत आहेत. लाखो मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले आहे. जाणून घ्या जरांगे यांच्याबद्दल माहित नसलेल्या बाबी.
मनोज जरांगे २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली येथून मुंबईकडे रवाना झाले होते. आळे फाटा, शिवनेरी-खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी, चेंबूर असा प्रवास करत आज सकाळी ते मुंबईत दाखल झाले. या आंदोलनामुळे “मनोज जरांगे पाटील नेमके कोण?” याविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
25
मागील १५ वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा
पूर्ण नाव : मनोज रावसाहेब जरांगे-पाटील
वय : ४३ वर्षे (जन्म १ ऑगस्ट १९८२)
मूळ गाव : मातोरी, ता. गेवराई (जालना जिल्हा)
चार भावांमध्ये सर्वात धाकटे
पत्नीचे नाव सुमित्रा पाटील, चार अपत्ये (३ मुली, १ मुलगा)
हैदराबाद गॅझेटियर लागू करावा, सातारा व बॉम्बे गॅझेटियरचा आधार घ्यावा.
सगे-सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून पात्रांना आरक्षण द्यावे.
आंदोलकांवर झालेल्या गुन्ह्यांची माफी व्हावी.
कायद्यात बसणारे स्थायी आरक्षण द्यावे.
55
सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
आझाद मैदानात सुरू होणारे हे आंदोलन किती तीव्र रूप धारण करणार आणि राज्य सरकार काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आजपासून उपोषण सुरु झालं आहे. यावर सरकारकडून कोणत्या वाटाघाटी केल्या जातात हे बघण्यासारखे असेल. गेल्या वेळी जेव्हा जरांगे मुंबईत आले होते तेव्हा वाशी येथूनच परत गेले होते. पण यावेळी ते आझाद मैदानात उपोषण करत आहेत.