मुंबई - गणेश चतुर्थीच्या उत्साहात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. सर्वसामान्यांबरोबरच सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेमंडळीही बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आहेत. पुढील स्लाईडवर बघा दोघांचा व्हिडिओ.
याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी तिने गडद हिरव्या रंगाचा सलवार घातला होता. तिने डोक्यावर ओढणीही घेतली होती. तिचं हे पारंपरिक रूप चाहत्यांनाही खूप आवडलं. एवढंच नव्हे तर तिच्या कानात पार्थ काही तरी सांगतात. त्यानंतर ती मोदकाच्या ताटाला हात लावते.
25
दोघे लालबागच्या राजाच्या दर्शनाला
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दोघेही लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले होते. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या जॅकलिनने डोक्यावर ओढणी घेऊन श्रद्धेने दर्शन घेतलं. त्याआधी पार्थ पवार यांनी खिशातून काही 500 च्या नोटा काढून जॅकलिनच्या हातात दिल्या. जॅकलिनने त्या नोटा थेट लालबागच्या राजाच्या दानपेटीत टाकल्या. त्यानंतर दोघांनीही बाप्पाच्या चरणी वंदन करून आशीर्वाद घेतला.
35
नेटकऱ्यांकडून मिश्र प्रतिक्रिया
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड गाजत असून नेटकऱ्यांकडून मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांची निखळ मैत्री असल्याचे सांगितले आहे तर काहींनी इतर बाबी मांडल्या आहेत.
पार्थ पवार यांनी २०१८-१९ मध्ये सक्रिय राजकारणात पाऊल टाकलं होतं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ मतदारसंघातून उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्यांचा पराभव शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला.
55
वेलकम टू द जंगल
दरम्यान, जॅकलिन फर्नांडिस काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारसोबतच्या मल्टिस्टारर हाऊसफुल ५ मध्ये झळकली होती. लवकरच ती वेलकम टू द जंगल या मोठ्या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, संजय दत्त, रवीना टंडन, दिशा पाटनी यांच्यासोबत दिसणार आहे.