Maharashtra Heavy Rain Updates: हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Maharashtra Heavy Rain Updates: मुंबईत आज मुसळधार पाऊस होणार, 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
हवामान खात्याच्या वतीने मुंबईसाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सकाळपासून उपनगरात पावसाळा दमदार सुरुवात झाली असून त्यामुळं नोकरदार लोकांची मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली आहे.
26
वांद्रे परिसरात पडतोय चांगला पाऊस
वांद्रे परिसरात चांगला पाऊस पडत असल्याचं दिसून आलं आहे. वांद्रे सी लिंक रोडवर संध्याकाळसारखा अंधार दाटून आला आहे. सगळ्या ठिकाणी काळे ढग दिसून आले आहेत.
36
हेडलाईट लावून करावा लागतोय प्रवास
हेडलाईट लावून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. आज रविवार असल्याने अनेक शाळा आणि कार्यालये बंद आहेत त्यामुळे मुंबईकरांना त्रास होण्याची शक्यता कमी आहे. पण तरीही पाऊस पाण्याचा प्रवास करणे शक्यतो टाळायला हवे.
महापालिका प्रशासन सतर्क झाले असून महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलीस प्रशासन कक्ष सतर्क झाले आहेत. ते संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
56
कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला?
आज महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे.
66
ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट कुठं दिला?
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि संभाजीनगर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्यात.