मुंबई: मुंबई महानगरात स्वतःचं घर असावं, हे लाखो लोकांचं स्वप्न असतं. हे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) अनेक वर्षांपासून घरे, प्लॉट्स आणि गाळे लॉटरी व ई-ऑक्शनद्वारे उपलब्ध करून देत आहे. मात्र, अर्ज प्रक्रिया, लॉटरीचे नियम, आवश्यक कागदपत्रं याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.
या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी MHADA ने एक अभिनव पाऊल उचललं आहे. "म्हाडासाथी" नावाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित स्मार्ट चॅटबॉट नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित करण्यात आला आहे.