Mumbai Rain Update: कोकणात पावसाचा जोर कायम; मुंबई, ठाणे रिमझिम पाऊस बरसणार

Published : Sep 01, 2025, 09:00 AM IST

पावसाळ्याच्या शेवटच्या महिन्यात कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये रिमझिम पावसाची शक्यता आहे.

PREV
16
Mumbai Rain Update: कोकणात पावसाचा जोर कायम; मुंबई, ठाणे रिमझिम पाऊस बरसणार

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथे पावसाचा जोर कमी राहणार आहे. या ठिकाणी जास्त पाऊस नसल्यामुळे काळजी करण्याची कोणतीही गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

26
पावसाचा जोर कायम

पावसाळ्याचा शेवटचा महिना सुरु झाला आहे. तरीही कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे.

36
हवामान विभागाने दिला येलो अलर्ट

हवामान विभागाच्या वतीने सलग तीन दिवसांपासून येलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना काळजी घेण्याचं अवाहन करण्यात आलं आहे.

46
मुंबईत रिमझिम पावसाच्या सरी कोसळणार

मुंबईत रिमझिम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. मुसळधार पाऊस होणार नसल्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. दिवसभर वातावरण ढगाळ राहणार असून तापमान किमान 25 अंश सेल्सियस ते कमाल 30 अंश सेल्सियस दरम्यान राहील.

56
नवी मुंबई आणि ठाणे येथे रिमझिम पाऊस बरसणार

नवी मुंबई आणि ठाणे येथे रिमझिम पाऊस बरसणार आहे. दिवसभर वातावरण ढगाळ राहणार असून दुपारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

66
पालघर जिल्ह्यात हलक्या सरी बरसणार

पालघर जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत. आज पालघरचे तापमान किमान 25 अंश सेल्सियस तर कमाल 31 अंश सेल्सियस दरम्यान असेल. वारे प्रामुख्याने पश्चिमेकडून येतील आणि त्यांचा वेग 10 ते 18 किमी प्रती तास इतका राहील.

Read more Photos on

Recommended Stories