मनोज जरांगेंच्या मागणीनंतर ओबीसी समाज आक्रमक, काल दिवसभरात काय घडलं?

Published : Aug 30, 2025, 10:40 AM IST

मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाल्याने नागपुरात साखळी उपोषण सुरू झाले आहे. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी हे उपोषण ३० ऑगस्टपासून टप्याटप्याने सुरू राहणार आहे.

PREV
16
मनोज जरांगेंच्या मागणीनंतर ओबीसी समाज आक्रमक, काल दिवसभरात काय घडलं?

मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. त्यांनी नागपूर येथे आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.

26
मनोज जरांगे यांच्या मागणीमुळे ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण

मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून नागपुरात साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे.

36
एक दिवसाची मिळाली मुदतवाढ

मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात झाली आहे. आता या उपोषणासाठी एक दिवसाची मुदतवाढ करून मिळाली आहे.

46
ओबीसींचे साखळी उपोषण सुरु

ओबीसी समाजाने साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. ते ३० ऑगस्टपासून सुरु झाले असून टप्याटप्याने सुरु राहणार आहे. यावेळी आरक्षण वाचवण्यासाठी हे उपोषण करणार असल्याचं समाजाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

56
उपोषणाला संविधानाची मिळाली परवानगी

ओबीसींच्या उपोषणाला पोलिसांच्या वतीने परवानगी देण्यात आली आहे. उपोषण आज सकाळी १० वाजल्यापासून सुरु होणार असून ३ वाजेपर्यंत चालणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

66
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये

मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनावर त्यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, तो त्यांचा आणि सरकारचा प्रश्न आहे, त्यांनी तो त्यांच्या लेव्हलवर पाहून घ्यावा. आम्ही आपला अधिकार अबाधित ठेवण्यासाठी उपोषणाला बसलो आहोत.

Read more Photos on

Recommended Stories