या पार्श्वभूमीवर सीएसएमटी स्थानक परिसरात वाढलेल्या आंदोलकांच्या गर्दीचा विचार करून मुंबई वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी आणि पालिकेकडे जाणारे सर्व मार्ग आजपासून बंद ठेवण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा वाहतूक विभागाला अतिरिक्त पोलिस बंदोबस्तही देण्यात आला आहे.