Atal Setu Accident Video : मुंबई अटल सेतूवर भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकल्याने 5 जण जखमी

Atal Setu Accident Video : मुंबईमध्ये अटल सेतूवर कारचा अपघात झाला आहे. रविवारी (21 जानेवारी) झालेल्या या भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Atal Setu Accident Video : मुंबईतील अटल सेतूवर रविवारी (21 जानेवारी) कारचा भीषण अपघात झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अपघाताच्या व्हिडीओमध्ये लाल रंगाच्या कारची दुभाजकाला जोरदार धडक बसल्याचे दिसत आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकून हा भीषण अपघात झाला.

अटल सेतूवर पहिल्या अपघाताची नोंद 

अटल सेतूवर झालेल्या पहिल्या अपघातामध्ये मारुती कारमधील दोन महिला आणि तीन लहान मुले जखमी झाले आहेत. हे पाच प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता या सर्वांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. पण ज्या प्रकारे ही दुर्घटना घडली, त्यानुसार जर पुलावरील अन्य गाड्यांचीही एकमेकांना धडक बसली असती तर मोठा अपघात होऊ शकला असता. पण सुदैवाने दुर्घटना टळली.

अटल सेतूवर प्रवास करणाऱ्या वाहनांकरिता वेग मर्यादा

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर (MTHL) बाईक, रिक्षा आणि ट्रॅक्टर चालवण्यास परवानगी नाही. सुमारे एक हजार खांबांवर उभारलेल्या या मार्गावर चारचाकी वाहनांकरिता 100 किलोमीटर प्रती तास वेगाने प्रवास करण्याची मर्यादा आहे. तसेच पुलावर प्रवेश करताना तसेच पुलावरून बाहेर पडण्याच्या ठिकाणी वाहनांचा वेग ताशी 40 किलोमीटर इतका मर्यादित असावा.

वेग मर्यादा आणि नियमांचे पालन करा - मुख्यमंत्री शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 जानेवारी रोजी ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतू’ चे लोकार्पण केले. यानंतर दुसऱ्या दिवशीच वाहतुकीसाठी हा मार्ग खुला करण्यात आला. वाहनचालकांनी या सेतूवरून प्रवास करताना वेग मर्यादा आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते.

आणखी वाचा

Ram Mandir Pran Pratishtha : पंतप्रधान मोदींचे अयोध्येतील असे आहे वेळापत्रक, 5 तासांत काय करणार? जाणून घ्या

Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचा पहिला Video समोर, पाहा परिसरातील मनमोहक दृश्य

22 January 2024 Horoscope : रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल? जाणून घ्या सविस्तर

Share this article