मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानच्या गणपती बाप्पाचे पर्यावरणपुरक पद्धतीने विसर्जन, पाहा खास फोटोज

Published : Sep 06, 2025, 04:06 PM IST

आज देशभरात गणेश चतुर्दशीचा उत्साह साजरा केला जात आहे. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावरील गणपती बाप्पाचे आज विसर्जन करण्यात आले. याचेच काही खास फोटोज पाहूया. 

PREV
16
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बाप्पा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावरील बाप्पाला आज अनंत चतुर्दशीनिमित्त निरोप देण्यात आले. 

26
आनंदात बाप्पाला निरोप

बाप्पाला आनंदात आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात निरोप देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण परिवार आणि राजकीय नेते उपस्थित होते. 

36
पर्यावरणपुरक पद्धतीने विसर्जन

वर्षा निवासस्थानी आज लाडक्या बाप्पाचे कुटुंबियांसोबत, पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. याचेच काही फोटोज मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

46
मुख्यमंत्र्यांची पोस्ट

बाप्पा तर आपल्या प्रत्येकाच्या मना-मनात सदैव विराजमान असतो आणि त्याचे आशीर्वादही कायम आपल्या सोबत असतात. पण गेले 10 दिवस बाप्पाच्या भक्तीने तल्लीन झालेले मन आज बाप्पाचा निरोप घेताना भरून आले.

56
बाप्पाला अखेरचा निरोप

बाप्पाची कृपा सदैव आपल्यावर राहील, या विश्वासाने पुढच्या वर्षी आणखी उत्साहाने गणरायाचे स्वागत करण्यासाठी सज्ज राहू. 

66
पुढच्या वर्षी लवकर या...

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! असे मुख्यमंत्र्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Read more Photos on

Recommended Stories