१५ जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथे टेस्ला या कारचे पहिले शोरूम सुरू करण्यात आले. त्यानंतर ५ सप्टेंबरपासून कंपनीने गाड्यांचे वितरण सुरू केले. देशातील सर्वात पहिली टेस्ला कार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरेदी केली आहे. पुढील स्लाईडवर बघा व्हिडिओ.
“भारतातील पहिली टेस्ला कार विकत घेता आली याचा मला खूप अभिमान आहे. महत्त्वाचे म्हणजे मी ही कार कोणतेही डिस्काऊंट न घेता पूर्ण पैसे भरून विकत घेतली आहे. तसेच ही कार मी माझ्या मुलाला नाही, तर नातवाला देत आहे. तो शाळेत ही कार घेऊन जाईल आणि पर्यावरणपूरक कारचा संदेश सर्वांना देईल.”
त्यांनी यापूर्वीच निर्धार व्यक्त केला होता की, “देशातील पहिली टेस्ला गाडी मीच खरेदी करणार.” अखेर त्यांनी आपला शब्द पाळत गाडी विकत घेतली.
टेस्ला ही जगातील अत्याधुनिक आणि सुरक्षित कार म्हणून ओळखली जाते.
25
टेस्ला Model Y कारची वैशिष्ट्ये
टेस्ला ही जगातील अत्याधुनिक आणि सुरक्षित कार म्हणून ओळखली जाते.
Tesla 3 RWD मॉडेल ५.६ सेकंदात ० ते १०० किमी/ताशी वेग पकडते.
Tesla 3 LR RWD एकदा चार्ज केल्यावर तब्बल ६२२ किमी प्रवास करू शकते.
Tesla Standard RWD एकदा चार्ज केल्यावर ५०० किमी प्रवास करू शकते.
35
ही आहेत वैशिष्ट्ये
नवीन Model Y मध्ये बाह्य व आतील डिझाइन बदलले असून, मागील सीटसाठी स्वतंत्र टचस्क्रीन व इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंटची सुविधा आहे.
Model Y ही टेस्लाची सर्वाधिक विकली जाणारी कार असून, जगभरातही ती टॉप सेलिंग कार्सपैकी एक आहे.
भारतात ही कार CBU (Completely Built Unit) स्वरूपात आयात होत असल्याने किंमत जास्त आहे.
तिची स्पर्धा BMW X1 LWB, Volvo C40, BYD Sealion 7, Mercedes-Benz EQA यांच्याशी होणार आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.