डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'जनता' वृत्तपत्राच्या 3 खंडांचे प्रकाशन

Published : Apr 29, 2025, 05:07 PM IST
देवेंद्र फडणवीस

सार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२९ ए्प्रिल) मंत्रालय, मुंबई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या जनता वृत्तपत्राच्या खंड 7, 8, 9 सह इंग्रजी खंड 4 चे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड 2च्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन केले.

मुंबई ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२९ एप्रिल) मंत्रालय, मुंबई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या जनता वृत्तपत्राच्या खंड 7, 8, 9 सह इंग्रजी खंड 4 चे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड 2 च्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे जनता खंड 7, 8, 9 ची निर्मिती करण्यात आली आहे. 'जनता' हे वृत्तपत्र आंबेडकर चळवळीचा दस्ताऐवज असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 1930 ते 1956 पर्यंत ते प्रकाशित झाले होते. महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित आणि प्रकाशित साहित्य पुन्हा प्रकाशित करून सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने जनता वृत्तपत्राचे 6 खंड प्रकाशित केले आहेत.

जनता खंडांमध्ये काय असणार -

✅ जनता खंड 7-

12 फेब्रुवारी 1938 ते 28 जानेवारी 1939 पर्यंतच्या एकूण 48 अंकांचा समावेश

✅ जनता खंड 8-

4 फेब्रुवारी 1939 ते 27 जानेवारी 1940 पर्यंतच्या एकूण 48 अंकांचा समावेश

✅ जनता खंड 9-

3 फेब्रुवारी 1940 ते 1 फेब्रुवारी 1941 पर्यंतच्या एकूण 48 अंकांचा समावेश

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मुख्य सचिव, समितीचे सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

PREV

Recommended Stories

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो लक्ष द्या! 8–9 डिसेंबरला 24 तास पाणी कपात; 14 विभागांवर मोठा परिणाम
Mumbai Local : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! सुरक्षेसाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन', लोकलमध्ये 'हा' जबरदस्त बदल होणार!