उदंचन जलविद्युत प्रकल्पांमध्ये तब्बल ₹57,260 कोटींची गुंतवणूक

Published : Apr 29, 2025, 04:47 PM IST
देवेंद्र फडणवीस

सार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाजनको, महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड व अवाडा ग्रुप यांच्यामध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले.

मुंबई ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाजनको, महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड व अवाडा ग्रुप यांच्यामध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. या करारांच्या माध्यमातून 8905 मेगावॅट वीजनिर्मिती, 57260 कोटींची गुंतवणूक आणि 9200 रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

या प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल 8905 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. त्याचा फायदा महाराष्ट्राला होणार आहे. तसेच 57260 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. 9200 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांना रोजगार मिळणार आहे.

महाजनकोच्या माध्यमातून घाटघर (125 मेगावॅट), कोडाळी (220 मेगावॅट), वरसगाव (1200 मेगावॅट) व पानशेत (1600 मेगावॅट) येथे प्रकल्प उभारले जातील. महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडकडून मुतखेड (110 मेगावॅट), निवे (1200 मेगावॅट) व वरंढघाट (800 मेगावॅट) येथे तर अवादा अ‍ॅक्वा बॅटरीजकडून पवना फल्याण (2400 मेगावॅट) व सिरसाळा (1250 मेगावॅट) येथे प्रकल्प उभारले जातील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,उदंचन जलविद्युत प्रकल्प हे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान असून, त्याद्वारे शेती, उद्योग व व्यावसायिक गरजांची पूर्तता होईल आणि पर्यावरण रक्षणालाही चालना मिळेल. राज्याच्या ऊर्जा क्षमतेपैकी 50% अपारंपरिक स्त्रोतांतून निर्माण करण्याचा शासनाचा मानस आहे.

यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री गिरीश महाजन आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

-------------------------

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट