मुंबईत क्रूरतेचा कळस! ९व्या मजल्यावरून मांजरीला फेकलं खाली; मन सुन्न करणारा व्हिडीओ व्हायरल

Published : Jun 12, 2025, 11:58 AM IST
Mumbai

सार

मलाडमध्ये एका व्यक्तीने 9 व्या मजल्यावरुन मांजरीला खाली फेकल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे नेटकरी संतापले आहेत. 

मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरात** घडलेली एक अमानुष घटना सध्या संपूर्ण शहराला हादरवणारी ठरतेय.एका व्यक्तीने निरपराध मांजरीला थेट ९व्या मजल्यावरून खाली फेकले, आणि या क्रूर कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

सीसीटीव्हीत कैद झालेला संपूर्ण प्रकार

व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतं की, मांजर खिडकीजवळ ठेवलेल्या चपलांच्या रॅकवर बसलेली असते.तेवढ्यात एक व्यक्ती बॅग घेऊन तिच्या जवळ येतो आणि रागाने पाहून अचानक तिला उचलून थेट खिडकीबाहेर फेकून देतो.या अमानुष घटनेने प्राणीप्रेमी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

 

 

आरोपी कोण?

मीडिया रिपोर्टनुसार, या क्रूर कृत्याचा आरोपी “कसम सय्यद”असून, तो त्या इमारतीतच राहत असलेल्या एका फ्लॅटचा मालक आहे. त्याने मांजरीला ९व्या मजल्यावरून फेकल्याने ती थेट लोखंडी पत्र्यावर आदळली आणि जागीच मृत्युमुखी पडली.

पोलिसांत तक्रार दाखल

या घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.दुसऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कसम सय्यदच्या घराचे दरवाजे आणि मांजरीला फेकण्यात आलेली खिडकी दाखवत आहे.याच व्हिडीओमध्ये पोलीस तक्रारीची प्रतही दाखवण्यात आली आहे, ज्यामुळे प्रकरणावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे.

 

नागरिकांमध्ये संताप

या संपूर्ण घटनेवर सामान्य नागरिक, प्राणीप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी वाढत आहे.

ही घटना केवळ एका मांजरीबाबत नाही, तर मानवतेच्या अधःपतनाचे भयावह चित्र दाखवणारी आहे. आता लक्ष या प्रकरणात पोलिसांची पुढील कारवाई आणि न्यायालयीन प्रक्रियेवर केंद्रित झालं आहे.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!
गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!