मुंबईतील रेल्वे स्थानकाच्या परिसरातील बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या विरोधात दररोज कारवाई करा, महापालिकेचे आदेश

Published : Apr 04, 2024, 12:31 PM ISTUpdated : Apr 04, 2024, 12:34 PM IST
vegetable market

सार

मुंबईतील रेल्वे स्थानकाजवळील बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या विरोधात दररोज कारवाई करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. यानुसार 53 रेल्वे स्थानकाजवळील 4,773 बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

Mumbai : प्रवाशांना चालण्यासाठी होणाऱ्या गैरसोयीमुळे रेल्वे स्थानकाच्या परिसरातील बेकायदेशीर फेरीवाले पुन्हा महापालिकेच्या रडावर आले आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी जोशी (Municipal Commissioner Ashwini Joshi) यांनी म्हटलेय की, रेल्वे स्थानकाच्या आसपासच्या परिसरातील बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश आदेश दिले आहेत.

मार्च महिन्यात 53 रेल्वे स्थानकाजवळ कारवाई
गेल्या महिन्यात 5 मार्च ते 31 मार्चदरम्यान मुंबईतील 53 वेगवेगळ्या रेल्वे स्थानकाच्या परिसरात 4473 बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. खरंतर, बेकादेशीर फेरीवाले मुंबईत एखाद्या रिकाम्या जागी ताबा मिळवतात. याशिवाय मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या सीमेअंतर्गत येणाऱ्या स्थानकाच्या परिसरातही बेकायदेशीर फेरीवाल्यांनी ताबा मिळवला आहे.

फेरीवाल्यांसाठी सुप्रीम कोर्टाने सांगितलेय नियम
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, फेरीवाल्यांना रेल्वे स्थानक परिसराच्या 150 मीटर आणि शाळेपासून 100 मीटरच्या अंतरामध्ये व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. तरीही फेरीवाले रेल्वे परिसरातील रस्ते, फूट ओव्हर ब्रिज, पुलावर आपला व्यवसाय करताना दिसून येतात.

अश्विनी जोशी यांनी म्हटले की, रेल्वे स्थानकाच्या परिसरात दररोज चार बेकायदेशीर विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई केली जाते. जेणेकरुन प्रवाशांची गैरसोय होऊ नये. महापालिकेच्या परवाना विभागानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मस्जिद बंदर, मलाड आणि अन्य 53 रेल्वे स्थानकाच्या क्षेत्रातील 4773 बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

आणखी वाचा : 

1 एप्रिलपासून LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत 32 रुपयांनी घट, जाणून घ्या मुंबई ते दिल्लीतील नवे दर

Lok Sabha Election 2024 : मुंबईतील दक्षिण मध्य जागेवर शिवसेना विरूद्ध शिवसेना लढणार, राहुल शेवाळेंचा विजय होणार?

Mumbai Weather : मुंबईत तापमानाचा पारा वाढणार, उन्हाच्या झळांपासून अशी घ्या आरोग्याची काळजी

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Viral Video : मुंबईत ८ महिने राहिल्यानंतर जपानी तरुणीने सांगितला अनुभव, व्हिडिओ व्हायरल
Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल