"सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या; आजारपणाने त्रस्त वृद्धेचा अंत"

Published : May 15, 2025, 11:30 PM IST
sucide

सार

दहिसरमध्ये एका ७२ वर्षीय वृद्ध महिलेने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. दीर्घकाळ आजाराने त्रस्त असलेल्या महिलेला सततच्या वेदनांमुळे मानसिक त्रास होत होता.

मुंबई | प्रतिनिधी शरीर थकलेलं होतं, पण वेदना थांबत नव्हत्या. उपचार सुरू होते, तरीही दिलासा मिळत नव्हता. अखेर ७२ वर्षीय वृद्ध महिलेनं जगण्याचं दुःख घेऊन दहिसरमधील आपल्या राहत्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.

ही हृदयद्रावक घटना दहिसर पूर्वेतील आर. एस. निमकर मार्गावर घडली. वृद्ध महिला गेल्या काही महिन्यांपासून गंभीर आजाराने त्रस्त होत्या. सततच्या वेदनांनी आणि आरोग्याच्या खचलेल्या स्थितीने त्या मानसिकदृष्ट्याही अत्यंत अस्वस्थ झाल्या होत्या, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

शुक्रवारी सकाळी, नेहमीप्रमाणे घरातील सदस्य आपल्या कामात व्यस्त असताना, त्यांनी बाल्कनीतून सातव्या मजल्यावरून खाली झेप घेतली. खाली पडताच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात आत्महत्येमागे कोणताही संशयास्पद प्रकार नसल्याचे समोर आले असून, वृद्ध महिलेला दीर्घकाळापासून आजार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. पोलीस अधिक तपास करत असून, पोस्टमॉर्टेम अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.

PREV

Recommended Stories

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो लक्ष द्या! 8–9 डिसेंबरला 24 तास पाणी कपात; 14 विभागांवर मोठा परिणाम
Mumbai Local : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! सुरक्षेसाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन', लोकलमध्ये 'हा' जबरदस्त बदल होणार!