
मुंबई : मुंबईतील मरीन ड्राईव्हचा ३.५ किमी लांबीचा प्रसिद्ध पदपथ आता मागे पडणार आहे. मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या 'धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा’ रस्त्यासह ७.५ किमी लांबीचा नवीन समुद्री पदपथ मुंबईकरांसाठी तयार होत आहे. हा पदपथ प्रियदर्शनी पार्क ते वरळी दरम्यान तयार केला जात असून, याचा काही भाग जुलै महिन्यात खुला होणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली आहे.
सागरी किनारा मार्ग आणि समुद्री पदपथ एकत्र
श्यामलदास गांधी उड्डाणपूल (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते वरळी येथील राजीव गांधी सागरी सेतूच्या टोकापर्यंत १०.५८ किमी लांबीचा सागरी किनारा मार्ग पूर्ण क्षमतेने वाहनांसाठी सुरू करण्यात आला आहे. या मार्गालगत मरीन ड्राईव्हप्रमाणेच समांतर समुद्री पदपथ तयार करण्यात येत आहे, जो मुंबईतील **सर्वात लांब आणि रुंद पदपथ ठरणार आहे. ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच हा पदपथ नागरिकांसाठी खुला होणार आहे.
जुलैमध्ये या भागांचा खुला होण्याचा अंदाज
या दोन्ही विभागांतील पदपथ जुलैच्या मध्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. हाजी अली येथे भूमिगत मार्गातून पादचाऱ्यांना मुख्य रस्त्याशी जोडले जाणार आहे. या पदपथालगत समुद्राकडून लाटांचा जोर झेलण्यासाठी ‘सी वॉल’ उभारण्यात आली आहे. ही भिंत नवी मुंबईतील उलवे येथून आणलेल्या 'आर्मर रॉक' नैसर्गिक दगडांपासून बनवली आहे. प्रत्येकी १ ते ३ टन वजनाचे दगड मोठ्या लाटा पेलू शकतील अशा प्रकारचे आहेत. मरीन ड्राईव्हवर वापरण्यात येणाऱ्या सिमेंट टेट्रापॉड्सच्या तुलनेत हे दगड पर्यावरणपूरक असून, सागरी जीवसृष्टीस अनुकूल ठरतात.
पदपथाची वैशिष्ट्ये
मुंबईकरांसाठी नवे विश्रांतीचे ठिकाण
हा नवीन समुद्री पदपथ मरीन ड्राईव्हच्या तुलनेत अधिक लांब व विस्तीर्ण असणार आहे. वाहतुकीपासून थोडा दूर, समुद्राच्या सान्निध्यात फिरण्यासाठी, व्यायामासाठी आणि विश्रांतीसाठी हे ठिकाण मुंबईकरांसाठी नव्याने खुलं होणार आहे. समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यात भर घालणारा आणि पर्यावरणपूरक दृष्टीने नियोजित असलेला हा पदपथ मुंबईच्या शहररचनेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.