Vivaan Karulkar Book : प्रत्येकाने वाचावे असे १८ वर्षीय लेखकाचे एलॉन मस्कवरील संशोधनात्मक पुस्तक, असा केलाय सनातन ते स्पेस आणि सायन्सचा प्रवास

Published : Jun 30, 2025, 11:34 AM ISTUpdated : Jun 30, 2025, 11:38 AM IST
Vivaan Karulkar

सार

विवानने वयाच्या आठव्या वर्षापासून एलॉन मस्क यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो त्यांच्या आयुष्याचा, उद्दिष्टांचा आणि परिवर्तनशील विचारशक्तीचा अभ्यास करत आहे.

मुंबई : अवघ्या १८ व्या वर्षी, देश-विदेशात नाव कमावलेला लेखक आणि वैज्ञानिक विवान करुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने आपल्या तिसऱ्या पुस्तकाची घोषणा केली आहे “Elon Musk: The Man Who Bends Reality”. हे प्रेरणादायी चरित्र २८ जून २०२५, म्हणजेच एलॉन मस्क यांच्या वाढदिवसाच्या दिवशी, सॉफ्ट लॉन्च करण्यात आले, ज्यातून या युगप्रवर्तक नेत्याला सॅल्यूट करण्यात आले.

एलन मस्कवर १० वर्षांचा अभ्यास

विवानने वयाच्या आठव्या वर्षापासून एलॉन मस्क यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो त्यांच्या आयुष्याचा, उद्दिष्टांचा आणि परिवर्तनशील विचारशक्तीचा अभ्यास करत आहे. हे पुस्तक केवळ एलॉन मस्क यांच्या यशोगाथेचे नव्हे, तर त्यामागच्या अज्ञात गोष्टी, प्रेरणादायी प्रसंग आणि मानसिक प्रवासाचे दस्तावेजीकरण आहे.

विवान सांगतो,"हे पुस्तक एलॉन मस्कसाठी माझी एक लहानशी श्रद्धांजली आहे, त्या माणसासाठी ज्याने अशक्य गोष्टी शक्य केल्या."

विवानची लेखनयात्रा, सनातन ते स्पेस आणि सायन्स

एलॉन मस्कवरचे हे पुस्तक विवानच्या लेखनशैलीतील एक मोठा टर्निंग पॉइंट आहे. यापूर्वी त्याने दोन पुस्तकांतून सनातन धर्म आणि विज्ञान-तंत्रज्ञानातील नातं अधोरेखित केलं होतं. “The Sanatan Dharam: True Source of All Science” हे त्याचं पहिलं पुस्तक २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिर, अयोध्या येथे श्री चंपत रायजी (मुख्य विश्वस्त, मंदिर ट्रस्ट) यांच्या हस्ते प्रकाशित झाले. हे पुस्तक राम लल्लाच्या गाभाऱ्यात चरणांजवळ ठेवण्यात आले, ही एक मोठी सन्मानाची बाब ठरली. दुसरे पुस्तक, “The Sanatan Dharam: True Source of All Technology”, १५ नोव्हेंबर २०२४ रोजी RSS प्रमुख डॉ. मोहन भागवत आणि ISRO चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या हस्ते प्रकाशित झाले. या पुस्तकांतून विवानने सिद्ध केले की, सनातन धर्म विज्ञानाचे मूळ आहे आणि आजच्या तंत्रज्ञानाचा पाया त्याच तत्वज्ञानावर आधारित आहे.

अवघ्या १५ व्या वर्षी पेटंट मिळवले

विवान केवळ लेखकच नाही तर एक किशोर वैज्ञानिकही आहे. वयाच्या १५ व्या वर्षी त्याला Near Earth Object (NEO) डिटेक्शनवर ‘In-Principle Patent’ मिळाले. यामुळे तो पेटंट मिळवणाऱ्या सर्वांत तरुण भारतीयांपैकी एक ठरला.

तरुणाईसाठी प्रेरणास्त्रोत

विवान करुलकर याने दाखवून दिलं आहे की, वय म्हणजे केवळ एक संख्या असते. त्याच्या पुस्तकांमधून केवळ माहितीच नाही, तर दृष्टिकोन, मूल्य आणि स्वप्न पाहण्याची प्रेरणा मिळते. एलॉन मस्कवरील हे तिसरे पुस्तक सध्याच्या पिढीसाठी फक्त एक चरित्र नसून, धाडसी विचार, नवीन प्रयोग आणि बदल घडवण्याची प्रेरणा आहे. विवानच्या मते, "मोठं स्वप्न पाहणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं, हाच खरा विज्ञानाचा अर्थ आहे."

पुढचं पाऊल?

तिसऱ्या पुस्तकाच्या निमित्ताने विवान करुलकर आता प्रौढ आयुष्याची सुरुवात करत आहे. ‘Elon Musk: The Man Who Bends Reality’ हे पुस्तक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नव्या वाचकांना प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या तरुण लेखक-विज्ञानप्रेमीच्या प्रवासाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Local Update : सावधान! लोकलमध्ये 'विनातिकीट' प्रवास करताय? आजच सुधारा, रेल्वेने दंडासोबत शिक्षेचे नियम बदलले!
Mumbai Metro 8 : मुंबईकरांची प्रतीक्षा संपली! मेट्रो ८ च्या स्थानकांची 'ही' आहेत अधिकृत नावे, संपूर्ण यादी फक्त एका क्लिकवर!