मुंबईच्या आजी-माजी महापौरांमध्ये झाला वाद, रितू तावडे पेडणेकरांवर गुन्हा दाखल करणार?

Published : Jul 04, 2026, 10:53 PM IST
ritu tawade

सार

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर महापौर दालनात गोपनीयतेचा भंग केल्याचा आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याचा आरोप केला आहे, तसेच गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. 

मुंबई: मुंबई महापालिकेच्या आजी माजी महापौरांमध्ये वाद झाल्याच दिसून येत आहे. महापौर रितू तावडे यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. दुसऱ्या बाजूला पेडणेकर यांनी हे आरोप बिनबुडाचे असून बालिश आरोप करत असल्याचं म्हटलं आहे.

रितू तावडे यांनी केले गंभीर आरोप 

रितू तावडे यांनी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पेडणेकर यांनी जमावासह प्रवेश केला होता, यावेळी त्यांनी दालनाचे चित्रीकरण केलं. तिथं उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेडणेकर यांनी दमदाटी केली, कार्यालयातील कागदपत्रांची पाहणी केली. महापौरांच्या संवेदनशील अशा दालनात प्रवेश करून गोपनीयतेचा भंग केला, असं तावडे यांनी म्हटलंय.

किशोरी पेडणेकर यांनी आरोप फेटाळले 

यावेळी किशोरी पेडणेकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटलं की, ३० मार्चपासून विविध नागरी प्रश्नांवर महापौरांना पत्र दिली होती. पण त्यांना महापौरांकडून उत्तर मिळालं नाही. प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यानं त्या महापौर कार्यालयात गेल्या होत्या. या घटनेमुळं आजी-माजी महापौर यांच्यातील वाद अजून तीव्र झाला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Pravin Darekar : मुंबईतील CJP चं आंदोलन पूर्णपणे फ्लॉप, प्रवीण दरेकरांची टीका
Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणात नवा ट्विस्ट, सचिन वाझेंच्या नियुक्तीवर वकिलांचा गंभीर आरोप