राज ठाकरेंनी भाजपच्या 'या' नेत्याच्या राजीनाम्याची केली मागणी, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

Published : Jul 04, 2026, 06:46 PM IST
Raj Thackeray Speech

सार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार अमित साटम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. साटम यांच्या बेफाम वागणुकीवर त्यांनी बोट ठेवले असून, यावर साटम यांनी घरात बसून बोलणाऱ्यांना उत्तर देणार नाही, असे प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई: सध्याचं राजकारण दूषित वातावरणानं ढवळून निघालंयं. सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंयं. या पत्रात त्यांनी अमित साटम यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी केली. तर त्यावर साटम यांनी राज यांना प्रत्युत्तर दिल आहे.

राज ठाकरे काय म्हणाले? 

राजा ठाकरे यांनी अमित साटम यांचा राजीनामा घेण्यात यावा असं पत्र लिहिलं. त्यांनी या पत्रात साटम यांचा बेफाम वागणारे असा उल्लेख केला. यावेळी राज यांनी प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून दिली. या नेत्यांनी कधीही स्वतःच्या पक्षातील नेत्यांच्या चुकांवर पांघरून घातलं नाही. साटम यांच्या असंवेदनशीलतेवर फडणवीस मौन का बाळगू राहिलेत हा प्रश्न ठाकरे यांना पडल्याचं पत्रातून दिसून आलं.

अमित साटम यांनी काय दिल प्रत्युत्तर 

घरात बसून बोलणाऱ्यांना आम्ही उत्तर देणार नाही असं अमित साटम यांनी म्हटलं आहे. तुम्ही आधी फिल्डवर होतात, नालेसफाईची काम करत होतात. त्यांनी फिल्डवर राहून काय केलं याच उत्तर द्यावं. झाड पडून एका लहान मुलाचा मृत्यू झाला, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. आता या आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात सामान्य नागरिक मात्र भरडला जातोय.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Nalasopara news : वाढदिवसानिमित्त केक आणला, कापलाही.... खाताना केकमध्ये मेलेली पाल दिसली, ८ जण रुग्णालयात दाखल
Surrogate Ad : शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला FDA ची नोटीस; जाहिरातीमुळे अडकले