घणसोली बस आगारात अग्नितांडव, धुराचे लोट पाहून प्रवाशांच्या पोटात आला गोळा

Published : Jun 04, 2025, 11:49 AM ISTUpdated : Jun 04, 2025, 12:26 PM IST
bus stand

सार

आज पहाटे घणसोली येथील एनएमएमटी बस डेपोमध्ये भीषण आग लागली. या आगीत अनेक बसेस जळून खाक झाल्या असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

आज पहाटे घणसोली येथील एनएमएमटी (NMMT) बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या अनेक बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली. ही आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच एका मागोमाग एक बस जळून खाक झाली. या आगीत अनेक बसेस पूर्णपणे नष्ट झाल्या असून, आर्थिक नुकसानीचा आकडा कोटींच्या पुढे रुपयांवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बस डेपोमध्ये धुराचे लोट पाहिले. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आग पसरू नये म्हणून तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. नवी मुंबई आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल होऊन अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

सद्य स्थितीनुसार, १० ते १२ बसेस जळून खाक झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. या बसेस पार्किंगमध्ये उभ्या होत्या आणि यापैकी बहुतेक बसेस नियमित सेवेत वापरात होत्या. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

या आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. विद्युत शॉर्टसर्किट, मानवी हलगर्जीपणा, किंवा जानबूज तोडफोड – या सर्व शक्यतांचा तपास सध्या सुरू आहे. पोलिस आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळाची पाहणी केली असून, अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे.

एनएमएमटी सारखी संस्था ही नवी मुंबईतील लाखो प्रवाशांची वाहतुकीची लाईफलाईन आहे. अशा संस्थेच्या डेपोमध्ये जर अशी आग लागते आणि तोही कोणत्याही सुरक्षात्मक यंत्रणेशिवाय, तर यामागे गंभीर प्रशासकीय निष्काळजीपणा स्पष्ट दिसत आहे. सततच्या मेंटेनन्सची, सुरक्षा यंत्रणांची, सीसीटीव्हीची, रात्रपाळीतील गस्तीची खातरजमा नसणे — या सर्व बाबी गंभीर आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!
गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!